कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन
By Admin | Published: December 11, 2015 02:12 PM2015-12-11T14:12:01+5:302015-12-11T14:12:01+5:30
कच:यावर उत्तरं शोधणा:या एका दोस्ताचा प्रवास.
मी दोन वर्षापूर्वी मुंबईच्या प्रख्यात ओडीसीटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. केमिकल इंजिनिअर झालो. लगेच नोकरीही मिळाली. पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीत, देशातल्या सगळ्यात मोठय़ा नामांकित कंपनीत मी सुरतला नोकरीलाही लागलो. तिथं प्लास्टिक तयार करण्याचं, पॉलिमर बनवण्याचं काम चालायचं. त्या कंपनीत तासाला साधारण 35क् टन प्लास्टिक तयार व्हायचं. प्लास्टिकचं उत्पादन, त्याचा वापर यासह विविध पैलूंचा मी अभ्यास करतच होतो.
आणि मला प्रश्न पडला की, ज्या प्लास्टिकचं एवढं प्रचंड उत्पादन होतं ते पुढं जातं कुठं? कारण ही एक कंपनी एका तासाला जर एवढं उत्पादन करत असेल तर अशा कितीतरी कंपन्या आहेत, कितीतरी प्लाण्ट्स आहेत तिथं किती उत्पादन होत असेल?
अभ्यास करताना जाणवलं की हे प्लास्टिक लाइफसायकल संपल्यावर रिसायकल व्हायला जातंही, पण त्यासाठी होणारे प्रयत्न कमी आहेत. उत्पादन, वापर आणि व्यवस्थापन यातली तफावत मोठी आहे.
हे सारं चक्र माङया डोक्यात सुरूच होतं. त्याच काळात मी ‘निर्माण’च्या शिबिराला गेलो होतो. शाश्वत विकासाविषयी थोडीफार माहिती मला त्याकाळात झाली.
ते शिबिर संपवून मी सुरतला परत गेलो. मात्र माङया मनातले प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हते. सुरतला पोहचल्यावर मी छोटेमोठे प्रयत्न करतच होतो. प्लास्टिक जमा करून आम्ही ते रिसायकलिंगला पाठवलं. तापी नदीसाठी एक क्लिनअप प्रोजेक्टही केला. मी लोकांशी बोलत होतो, प्लास्टिक वापर आणि व्यवस्थापन याविषयी माहिती देत होतो. पण ते सगळे छोटे छोटे प्रयत्न होते. माङयापुरते होते.
काही दिवसांनतर मी जव्हार येथील ‘बायफ’ या संस्थेला भेट दिली. त्यावेळेस माङयासमोर कृषिकच:याचा प्रश्नही आला.
मी कायम शहरात राहिलो होतो, कच:याचा प्रश्न फक्त शहरातला आहे, असंच मला वाटायचं. पण पहिल्यांदा मला कळलं की कच:याचा हा प्रश्न ग्रामीण भागातही आहे.
कच:याच्या या प्रश्नानं मला झपाटलं होतं.
एक केमिकल इंजिनिअर म्हणून याप्रश्नी मी काही तोडगा शोधू शकतो का, असा मी विचार करत होतो. अभ्यास करत होतो.
याच काळात माझी मुंबई आयआयटीतल्या प्रा. संजय महाजनींशी भेट झाली. टाटा सेंण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन या संस्थेत काही प्रकल्प सुरू होणार होता. कच:यातूनच काही ऊर्जानिर्मिती करता येईल का या विषयावर माझं विचारचक्र सुरू असतानाच या उपक्रमाशी संपर्क आला. टाटा ट्रस्ट आणि आयआयटी यांच्या संयुक्त माध्यमानं कच:यापासून इंधननिर्मिती, तसेच स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी याबद्दल एक कार्यक्रम आखला गेला. या विषयात मला रस असल्यानं मी ‘कार्पोरेट’मधली नोकरी सोडली आणि तिथं रुजू होण्याचा निर्णय घेतला.
साधारण कॉलेज ते कार्पोरेट ते कचरा व्यवस्थापन आणि त्याचा सुयोग्य वापर या टप्प्यातून प्रवास करत मी एका नवीन कामाला नव्या ऊर्जेनं सुरुवात केली.
शहरात तयार होणा:या कच:याचे योग्य असे वर्गीकरण करून त्यातल्या कोणत्या भागाचे रूपांतरण वायू स्वरूपातील इंधनात करता येईल, ग्रामीण भागातील शेतमालाचा वापर झाल्यानंतर उरणारा कचरा जाळून न टाकता त्यापासून ऊर्जानिर्मिती करून विजेची गरज कशी भागवता येईल याचा शोध घेणं, कच:यापासून बनणारं इंधन वापरून धूर न येणारी चूल तयार करणं असं सध्या आमचं काम सुरू आहे.
मात्र हे सारं करताना माङया लक्षात काही गोष्टी येताहेत. कचरा हा काही एकाच जागी नसतो, तो पसरलेला आहे. आणि तो सर्वत्र एकसारखाही नाही. वर्गीकरण करायला गेलं तर त्यातही अनेक प्रकार दिसतात. म्हणजे सगळ्या कच:यावर सरसकट एकच तोडगा असं होत नाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कचरा म्हणायचं कशाला? तर अशी गोष्ट जिचा वापर करून संपलेला आहे, त्याचा काही उपयोग उरलेला नाही अशी गोष्ट.
अशा कच:याचं स्वरूप मोठं आहे आणि त्यामानानं आपले प्रयत्न तोकडे आहेत. कारण आपल्याकडचे मूलभूत प्रश्नच अजून सुटलेले नाहीत. पाणी, वीज हे प्रश्न आधी, कच:याची विल्हेवाट हा प्रश्न प्राधान्यक्रमात सगळ्यात शेवटी येतो. त्यामुळे या विषयातले संशोधनही तुलनेनं मागेच आहे. आणि सोल्यूशन सापडणं, ते वापरून पाहणं हेदेखील तुलनेनं कमी आहे.
त्यामुळे मला वाटतं की, मी एक केमिकल इंजिनिअर म्हणून असं काही काम करावं की त्यातून कचरा-पुनर्वापर-इंधननिर्मिती याविषयी काही ठोस पर्याय देता यावा!
सध्या मी त्यासाठीच प्रयत्न करतो आहे!!
- विवेक पाटील
vivek28patil@gmail.com