बांगलादेशात पंचांचे पुतळे जाळले

By Admin | Published: March 21, 2015 01:10 AM2015-03-21T01:10:53+5:302015-03-21T01:10:53+5:30

भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे.

The statue of umpires burned in Bangladesh | बांगलादेशात पंचांचे पुतळे जाळले

बांगलादेशात पंचांचे पुतळे जाळले

googlenewsNext

ढाका : भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे. प्रमुख वृत्तपत्र असलेल्या समोकालने ‘पंचांनी बांगलादेशला हरविले’, असे तर ढाका ट्रिब्यूनने ‘भारत व पंचांनी विश्वचषकाच्या क्वार्टरफायनलमध्ये बांगलादेशला नमविले’असे शीर्षक दिले आहे. अनेक चाहत्यांनी स्वत:चा राग व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. याशिवाय शेकडो चाहत्यांनी जाळपोळ करीत देशभरात राग व्यक्त केला. ढाका विद्यापीठात विद्यार्थ्यांनी मार्च काढून पंच अलिम दार यांचा पुतळा जाळला. फेसबुक आणि टिष्ट्वटरवर चाहत्यांनी स्वत:ची तीव्र भावना व्यक्त केली. एका चाहत्याने लिहिले, ‘गुरुवारी आम्ही काय पाहिले... बांगलादेशाला किमान तीन वेळा योग्य निर्णयापासून वंचित ठेवण्यात आले!’

Web Title: The statue of umpires burned in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.