खूशखबर ! व्हॉट्सअॅपच्या जुन्या स्टेटसचं Come Back

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2017 12:10 PM2017-03-21T12:10:27+5:302017-03-21T12:28:17+5:30

व्हॉट्स अॅपच्या नवीन 'स्टेटस' फीचरपासून कंटाळलेल्या, फीचरच न आवडलेल्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्स अॅपचे जुने 'टेक्स्ट स्टेटस फीचर' पुन्हा उपलब्ध झाले आहे.

Good news! Whatsapp's Old Status Come Back | खूशखबर ! व्हॉट्सअॅपच्या जुन्या स्टेटसचं Come Back

खूशखबर ! व्हॉट्सअॅपच्या जुन्या स्टेटसचं Come Back

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 -  व्हॉट्स अॅपच्या नवीन 'स्टेटस' फीचरपासून कंटाळलेल्या, फीचरच न आवडलेल्या युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्स अॅपचे जुने 'टेक्स्ट स्टेटस फीचर' पुन्हा  उपलब्ध झाले आहे.  यामुळे युजर्संना पुन्हा 'टेक्स्ट स्टेटस' ठेवता येऊ शकणार आहे. हे फीचर अबाऊट (About) आणि फोन क्रमांकाशेजारी दिसेल. नवीन 'टेक्स्ट फीचर' जुन्या फीचरप्रमाणेच आहे. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, अॅप अपडेट केल्यानंतरही तुमचे सर्व जुने स्टेटस तुम्हाला पुन्हा मिळणार आहेत. जुने स्टेटस पाहून तुम्हाला आनंद होणार, हे नक्कीच.   
 
प्ले स्टोरमध्ये गेल्यानंतर व्हॉट्स अॅप मेसेंजर अॅप अपडेट करा. अॅप अपडेट केल्यानंतर आता प्रोफाइल पेजवर एक 'स्टेटस टेक्स्ट' मेसेज दिसेल. हा 'टेक्स्ट मेसेज' म्हणजेच स्टेटस नवीन स्टेटस टॅबमधील फोटो, व्हिडीओ आणि जीफ फाईलप्रमाणे 24 तासांनंतर आपोआप डिलीट होणार नाही. पण आयफोन युजर्संना या फीचरसाठी किमान दोन ते तीन दिवस वाट पाहावी लागेल. 
(Alert: ...तर तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप होणार बंद)
काही दिवसांपूर्वी, जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपने 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त नवं स्टेटस फीचर आणलं होतं. नवीन स्टेटस फीचर लाँच केल्यानंतर व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फीचर हटवल. अनेकांनी जुने फीचर हटवण्यात आल्याबाबत नाराजी सूर व्यक्त केला होता. अपडेट झालेले अॅप फारसं न आवडल्याने अनेकांनी नाकं मुरडली.  ''म्हणजे आम्ही आता काय दर 24 तासांनी सारखं स्टेटस अपडेट करत बसाययं का?'', अशा आणि यासारख्या अनेक प्रतिक्रिया युजर्सकडून येऊ लागल्या. 
(व्हॉट्सअॅपवरही सुरू होणार जाहिरातींची कटकट?)
युजर्सकडून मिळालेल्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे व्हॉट्स अॅपने जुने स्टेटस फीचर पुन्हा आणले आहे.  दरम्यान, व्हॉट्सअॅपच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस फीचर सुरूदेखील करण्यात आलं होते.   विशेष म्हणजे, व्हॉट्स अॅपचे जुने फीचर स्टेटस जरी पुन्हा येणार असले तरी 'स्टेटस स्टोरीज' फीचर मात्र कायम आहे.  
 
 

Web Title: Good news! Whatsapp's Old Status Come Back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.