भारत आशियाई टी-२० ‘चॅम्पियन’

By admin | Published: January 25, 2016 02:32 AM2016-01-25T02:32:22+5:302016-01-25T02:32:22+5:30

कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४४ धावांनी धुव्वा उडवून यजमान भारताने अंधांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले.

India Asian T-20 'Champion' | भारत आशियाई टी-२० ‘चॅम्पियन’

भारत आशियाई टी-२० ‘चॅम्पियन’

Next

कोची : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४४ धावांनी धुव्वा उडवून यजमान भारताने अंधांच्या पहिल्यावहिल्या टी-२० आशिया चषक स्पर्धेचे दिमाखदार विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या पाकिस्तानने साखळी फेरीत
भारताला नमवले होते. अंतिम सामन्यात भारताने त्या पराभवाचा चांगलाच वचपा काढताना दिमाखात बाजी मारली.
जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये झालेल्या या रंगतदार अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात २०८ धावांचा हिमालय उभारला. दीपक पटेल याने सर्वाधिक धावा काढताना ४० धावांची आक्रमक खेळी केली. तर केतन पटेलने त्याला उपयुक्त साथ देताना ३४ धावांची खेळी केली.
यानंतर भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना पाक संघाची सुरुवात खराब झाली. सामन्यातील दुसराच चेंडू टोलावताना फटका चुकल्याने सलामीवीर हरुन खान झेलबाद झाला. यामुळे धावांचे खाते उघडण्यापूर्वीच पाक संघाला पहिला धक्का बसला. यानंतर पुढच्याच षटकात मेहमूदचा त्रिफळा उडवून भारतीयांनी वर्चस्व मिळवले. या झटपट दोन धक्क्यानंतर पाक संघ अखेरपर्यंत सावरु शकला नाही.
भारतीयांनी यावेळी भेदक मारा केला आणि केवळ ४० धावांत पाकिस्तानचे ४ खंदे फलंदाज बाद करुन त्यांना दबावाखाली आणले. यावेळी आमीर इशफाकने २१ चेंडूत ३८ धावांचा तडाखा देत दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. आमीर नंतर अनीस जावेद यांनी इसरार हसन यांनी पाक संघाला सावरताना ११ व्या षटकांत ११३ धावांची मजल मारुन दिली.
मात्र पुन्हा फलंदाजीला गळती लागल्याने त्यांचा डाव १८.५ षटकांत १६४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानकडून अनीसने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तर दीपकने निर्णायक २ बळी घेत भारताच्या विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले.

Web Title: India Asian T-20 'Champion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.