६ वर्षांपूर्वी आजच सचिनने ठोकली वन-डेतील पहिली 'डबल सेंच्युरी'
By admin | Published: February 24, 2016 01:42 PM2016-02-24T13:42:05+5:302016-02-24T13:53:39+5:30
२४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरोधात नाबाद 'डबल सेंच्युरी' (नाबाद २००) फटकावत नवा विक्रम रचला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दोन दशकांहून अधिक काळ सर्वोत्तम खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडले. शतकांचे शतक, तसेच करीअरमध्ये सर्वात जास्त धावा ठोठावणारा क्रिकेटपटू यासह क्रिकेट जगतातील असंख्य रेकॉर्ड्स त्याच्या नावावर आहेत. या असंख्य विक्रमांसह त्याचा आणखी एक अनोखा विक्रम म्हणजे ' वनडे' (एकदिवसीय) सामन्यात द्विशतक फटकावणारा सचिन हा जगातील पहिला खेळाडू आहे. आजच्याच दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिनने ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात २०० धावांची नाबाद खेळी करत एक नवा विक्रम नोंदवला होता. सचिनने १४७ चेडूंमध्ये २५ चौकार आणि ३ षटकारांसह ही अविस्मरणीय खेळी करत भारताला ४०१ धावांच्या डोंगर रचून दिला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेला २४८ धावांमध्ये बाद करत हा सामना तब्बल १५३ धावांनी जिंकला आणि सचिनचे 'द्विशतक' सार्थ ठरवले.
एकदविसीय सामन्यात द्विशतक ठोकणार सचिन हा पहिलाच खेळाडू असून त्यानंतर भारताच्याच वीरेंद्र सेहवागने २०११ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात २१९ धावा फटकावत सचिनचा रेकॉर्ड मोडला. आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये २०९ तर नोव्हेंबर २०१४ मध्ये २६४ धावांची खेळी करत रोहित शर्मानेही नवा विक्रम रचला.
वन-डेमध्ये द्विशतक झळकावणारे खेळाडू
खेळाडूचे नाव | धावसंख्या | तारीख | विरोधी संघ |
सचिन तेंडुलकर | नाबाद २०० | २४ फेब्रुवारी २०१० | दक्षिण आफ्रिका |
वीरेंद्र सेहवाग | २१९ | ८ डिसेंबर २०११ | |
रोहित शर्मा | २०९ | २ नोव्हेंबर २०१३ | ऑस्ट्रेलिया |
रोहित शर्मा | २६४ | १४ नोव्हेंबर २०१४ | श्रीलंका |
ख्रिस गेल | २१५ | २४ फेब्रुवारी २०१५ | झिम्व्बाब्वे |
मार्टिन गुप्टिल | नाबाद २३७ | २१ मार्च २०१५ | वेस्ट इंडिज |