पाकिस्तानपेक्षा भारत जास्त दबावात
By admin | Published: March 18, 2016 03:32 PM2016-03-18T15:32:40+5:302016-03-18T15:56:55+5:30
टी २० विश्वचषकाच्या सुरवातीच्या सामन्यात भारताला न्युझीलंडकडून दारुण पराभव स्विकारावा लागला तर पाकिस्तानने बांगलादेश संघाचा दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे उद्या्च्या सामन्यात भारत दडपणाखाली असेल
Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १८ - पाकिस्तानपेक्षा भारत जास्त दबावाखाली आहे, टी २० विश्वचषकाच्या सुरवातीच्या सामन्यात भारताला न्युझीलंडकडून दारुण पराभव स्विकारावा लागला तर पाकिस्तानने बांगलादेश संघाचा दणदणीत पराभव केला आहे. भारतीय गोलंदाजांची अलीकडे फार चांगली कामगिरी झाली, हे खरे असले तरी आपल्या प्रेक्षकांपुढे विजयाचे दडपण घेऊन खेळताना कशी दाणादाण होते, हे नागपुरात पाहायला मिळाले. त्यामुळे १९ तारखेच्या होणाऱ्या भारत-पाक सामन्यात भारत दडपणाखाली असेल. असे मत पाकिस्तान संघाचे कोच आणि माजी कर्णधार वकार युनीस यांनी कोलकाता येथिल पत्रकार परिषेदेत मांडले. उद्या होणाऱ्या भारत-पाक सामन्यापुर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
भारत-पाक हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. त्याच्यांमधील सामन्याचा आनंद आशिया खंडापुरता मर्यादित नसून या सामन्याची जगातील सर्व क्रिडाप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील काही सामने पाकिस्तानने गमावले असले तरी पाक संघ सध्या संतुलीत आहे. विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यामुळे त्यांच्यावरील दबाव कमी झाला आहे. तर घरच्या मैदानावर पराभवाने सुरवात करणारा भारतीय संघ दबावात असेल.
दरम्यान, ईडन गार्डनवर १९ मार्चला खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तान संघाचे पारडे जड राहील, असे भाकीत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केले आहे. या दोन्ही संघांबद्दल गावसकर म्हणाले, ‘न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर चांगली कामगिरी करण्याचे भारतावर दडपण असेल. पाक संघाने मात्र पहिला सामना जिंकल्याने त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशावेळी पाकला भारताविरुद्ध सामन्यात विजयाची अधिक संधी असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर पाकिस्तानने १ सामना जिंकला आहे. टाय झालेला एक सामना भारतीय संघाने बोल्डआउटमध्ये (सुपर ओव्हर) जिंकला आहे.