विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

By admin | Published: March 19, 2016 09:05 AM2016-03-19T09:05:37+5:302016-03-19T09:34:43+5:30

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे

History of India - Pakistan match in World Cup | विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

विश्वचषकातील भारत - पाक सामन्याचा इतिहास

Next
>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १९ - विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आत्तापर्यंत १० वेळा पराभूत केले आहे. टी- २० मध्ये ४ वेळा तर एकदिवसीय सामन्यात ६ वेळा भारताने हा पराक्रम केला आहे. त्या आठवणींवर एक नजर..
 
१९९२ सिडनी, ऑस्ट्रेलिया 
१९९२ च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये ५४ रन केल्या, तसंच १ विकेटही काढली. भारतानं ही मॅच ४३ रननं जिंकली. 
 
१९९६ बंगळुरू, भारत
आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच ३७ धावांनी जिंकली. 
 
१९९९ मॅन्चेस्टर, इंग्लंड
२२७ रन्सचे माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या ५ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच ४७ धावांनी जिंकली. 
 
२००३ सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका
भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनचे शतक फक्त २ धावांनी हुकले, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा ६ गडी आणि २६ चेंडू राखून विजय झाला. 
 
२००७ डर्बन, दक्षिण आफ्रिका
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला.
 
२००७ जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका 
पहिल्याच टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि भारतानं टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
 
२०११ मोहाली, भारत
जेव्हा तुम्ही सचिनचे ४ कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं २०११ च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये २९ रन्सने पराभव झाला. 
 
२०१२ कोलंबो, श्रीलंका
विराट कोहलीच्या ७८ रनच्या खेळीमुळे टी २० वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं ८ विकेट आणि ३ ओव्हर राखून अगदी सहज जिंकली.
 
२०१४ मिरपूर,  बांगलादेश
२०१४ साली बांगलादेशात झालेल्या विश्वचषकात टीम इंडियानं उपविजेतेपद मिळवलं. त्या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानवर मात केली होती. मिरपूरच्या मैदानात टीम इंडियानं पाकिस्तानला सात विकेट्सनी सहज लोळवलं आणि पाकिस्तानवर ट्वेन्टी२० विश्वचषकातला चौथा विजय साजरा केला.
 
२०१५ अॅडलेड, ऑस्ट्रेलिया
या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीने १०७ धावांची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला. 
 

Web Title: History of India - Pakistan match in World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.