मलिंगा, युवराज पहिल्या सत्रात बाहेर

By admin | Published: April 8, 2016 03:18 AM2016-04-08T03:18:12+5:302016-04-08T03:18:12+5:30

टी-२० स्पेशालिस्ट आणि चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रातील पहिले ५ सामने खेळणार नसल्याची माहिती

Malinga, Yuvraj out in the first session | मलिंगा, युवराज पहिल्या सत्रात बाहेर

मलिंगा, युवराज पहिल्या सत्रात बाहेर

Next

मुंबई : टी-२० स्पेशालिस्ट आणि चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रातील पहिले ५ सामने खेळणार नसल्याची माहिती संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने दिली. पाँटिंगने सांगितले, ‘‘गुडघ्याच्या दुखापतीमुळे मलिंगाच्या सहभागाविषयी अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यामुळे पहिल्या ५ सामन्यांत तो जवळपास खेळणार नसल्याचे दिसत आहे.’’ त्याचप्रमाणे, ‘‘पहिले ५ सामने त्याच्याविना खेळल्यानंतर मलिंगाच्या तंदुरुस्तीनुसार त्याचा संघात समावेश केला जाईल,’’ असेही पाँटिंग म्हणाला.
याच वेळी दुसऱ्या बाजूला लढवय्या युवराजसिंगही दुखापतीमुळे आयपीएलमध्ये पहिले २ आठवडे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले
आहे. संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ‘‘उपचारांसाठी युवराज कमीत कमी दोन आठवडे स्पर्धेबाहेर राहील.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Malinga, Yuvraj out in the first session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.