दिल्ली-मुंबई चुरशीची लढत

By admin | Published: April 23, 2016 04:13 AM2016-04-23T04:13:25+5:302016-04-23T04:13:25+5:30

निराशाजनक सुरुवातीनंतर पुनरागमन करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी गृहमैदानावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे

Delhi-Mumbai Churshi fight | दिल्ली-मुंबई चुरशीची लढत

दिल्ली-मुंबई चुरशीची लढत

Next

नवी दिल्ली : निराशाजनक सुरुवातीनंतर पुनरागमन करणारा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ शनिवारी गृहमैदानावर गतचॅम्पियन मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयाची हॅट््ट्रिक पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सलामी लढतीत कोलकातार् विरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या दिल्लीने त्यानंतर दमदार पुनरागमन करीत पंजाब व बेंगळुरू संघांचा पराभव केला. तीन सामन्यांत चार गुणांची कमाई करणारा दिल्ली संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई संघ दोन विजय व तीन पराभवासह पाचव्या स्थानी आहे.
मुंबईची आतापर्यंतची कामगिरी संमिश्र ठरली आहे. पंजाब व बंगळुरु विरुद्ध विजय मिळवणाऱ्या मुंबईला पुणे, गुजरात व हैदराबाद विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला.
सुरुवातीला अपयशी ठरलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या फलंदाजांनी बेंगळुरूविरुद्धच्या गेल्या लढतीत चमकदार कामगिरी केली. बेंगळुरूविरुद्ध गतलढतीत शतक झळकावताना क्विंटन डिकॉकने दिल्लीचा विजय साकारला. डिकॉकसह करुण नायरने आपली जबाबदारी चोख बजावली. अन्य फलंदाजांच्या क्षमतेची चाचणी घेता आली नाही, ही प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी चिंतेची बाब आहे. दिल्लीची भिस्त ड्युमिनी व पवन नेगी व कार्लोस ब्रेथवेट यांच्यावर अवलंबून असेल. मुंबई मात्र ताळमेळ साधण्यात संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे, पण आरसीबीविरुद्ध त्यांनी १७० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता, हे विसरता येणार नाही.
> प्रतिस्पर्धी संघ :
मुंबई : रोहित शर्मा (कर्णधार), पार्थिव पटेल, पांड्या, जोस बटलर, मिशेल मॅक्क्लेनघन, रायडू, केरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, जगदीश सिचित, टिम साऊदी, जसप्रीत बुमराह, श्रेयश गोपाळ, आर. विनय कुमार, कोरी अँडरसन, उन्मुक्त चंद, मर्चंड डी लांगे, सिध्देश लाड, किशोर कामत, कृणाल पांड्या, दीपक पुनिया, नितिश राना, जीतेश शर्मा, नाथू सिंग, अक्षय वाखारे आणि मार्टिन गुप्टील.
दिल्ली डेअरडेव्हील्स :
झहीर खान (कर्णधार), क्विंटन डीकॉक, ड्युमिनी, मयांक अग्रवाल, श्रेयश अय्यर, कार्लोस ब्रेथवेट, करुण नायर, पवन नेगी, रिषभ पंत, संजू सॅमसन, पवन सुयाल, जयंत यादव, ख्रिस मॉरीस, सॅम बिलिंग्स, नॅथल कुल्टर नील, इम्रान ताहीर, महिपाल लोमोर, चामा मिलिंद, अमित मिश्रा, शमी, शाहबाज नदीम, खलील अहमद, अखिल हेरवाडकर आणि प्रत्युष सिंग
>

Web Title: Delhi-Mumbai Churshi fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.