करचुकवल्यामुळे मेस्सीव्यतिरिक्त अटक झालेले खेळाडू

By admin | Published: July 6, 2016 11:02 PM2016-07-06T23:02:51+5:302016-07-06T23:02:51+5:30

मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. अटक होणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू नाही, यापुर्वीही करचुकवल्यामुळे खेळांडूना अटक केली आहे. तर जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू.

Due to tax exemption, players arrested in addition to Messi | करचुकवल्यामुळे मेस्सीव्यतिरिक्त अटक झालेले खेळाडू

करचुकवल्यामुळे मेस्सीव्यतिरिक्त अटक झालेले खेळाडू

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ : कर चुकवेगिरीच्या तीन गुन्ह्यांमध्ये बार्सिलोना न्यायालयाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज यांना दोषी ठरवले. न्यायालयाने दोघांना २१ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर मेस्सीला २० लाख युरोचा दंडही ठोठावला आहे. अटक होणारा मेस्सी हा पहिलाच खेळाडू नाही, यापुर्वीही करचुकवल्यामुळे खेळांडूना अटक केली आहे. तर जाणून घेऊ कोण आहेत हे खेळाडू. 

 

लेस्टर पिगेट
इंग्लंडचा व्यावसायीक घोडेस्वार लेस्टर पिगेट याला तीन वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली होती. १९७० ते १९८५ या काळात त्याने आपले सुमारे २० मिलीयन पौंडाच्या उत्पन्नाचे विवरण योग्य रित्या न दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. या आरोपात त्याला इस्पिच क्राऊ़न कोर्टाने ही शिक्षा सुनावली होती. लेस्टर याने तीस लाख पौंडांचा कर चुकवला होता. ही रक्कम त्याने सिंगापूर, स्वित्झरलॅण्ड, बहामस आणि केमन आयलँम्ण्ड येथील बँकांत ठेवल्याचे तपासात समोर आले होते.

(लिओनेल मेस्सीला २१ महिने कारावास)

बोरीस बेकर
२००२ मध्ये लाखो युरोंचा कर चुकवल्या प्रकरणी जर्मनीचा टेनिस स्टार बोरीस बेकर याला म्युनिच न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्याला न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. कर चुकवेगिरी केल्याचे बोरीस बेकर याने मान्यही केले होते. त्याबदल्यात त्याने तीन मिलीयन युरो एवढी रक्कम कर आणि त्याचे व्याज या स्वरुपात दिली होती. १९९१ ते १९९३ या काळात १.७ मिलीयन युरोचा कर चुकवला होता. यानंतर १९९९ मध्ये बेकरने निवृत्ती स्विकारली.

पेट रोज
अमेरिकन बेसबॉल खेळाडू आणि सिनसिनाटी रेड स्टार पेट रोज याने कर चुकवेगिरी केल्या प्रकरणी त्याला २० एप्रिल १९९० ला दोषी ठरवण्यात आले. त्याने विविध मार्गातून मिळवलेल्या उत्पन्नाचे विवरण दिले नव्हते. त्याला ५० हजार डॉलरचा दंड ठोठावला होता. त्यानंतर जानेवारी १९९१ मध्ये चुकवलेला कर आणि त्यावरील व्याज यासाठी ३ लाख ६६ हजार ४१ डॉलरची रक्कम भरल्यावर मुक्त करण्यात आले. मात्र त्याला १ हजार तास कम्युनिटी सर्व्हिस देण्याची शिक्षा देण्यात आली.

Web Title: Due to tax exemption, players arrested in addition to Messi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.