पंतप्रधान नरेंद्र मोदी विराटचे कौतुक करतात तेव्हा...

By Admin | Published: October 8, 2016 12:53 PM2016-10-08T12:53:21+5:302016-10-08T13:00:07+5:30

कर्णधार विराट कोहलीने हाती घेतलेल्या सफाई मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले.

PM Narendra Modi praises Virat ... | पंतप्रधान नरेंद्र मोदी विराटचे कौतुक करतात तेव्हा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी विराटचे कौतुक करतात तेव्हा...

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. ८ -  इंदौर येथे भारत वि. न्युझीलंडदरम्यान तिस-या कसोटीस सुरूवात झाली असून दोन कसोटी सामने जिंकलेला भारत तिस-या कसोटीतही विजय मिळवून न्युझीलंडला ' क्लीन स्वीप' देण्याच्या तयारीत आहे. कर्णधार विराट कोहली सहका-यांसह नक्कीच मालिका खिशात टाकेल असा सर्व चाहत्यांना विश्वास आहे. मात्र या सामन्यापूर्वी कर्णधार कोहलीने वेगळीच 'क्लीन स्वीप' मोहिम हाती घेतली आणि त्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे कौतुक केले. 
सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी होळकर स्टेडियमवर सराव केला. मात्र त्यानंतर तेथे बराच कचरा झालेला होता. ते पाहून विराटने तेथे पडलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या उचलण्यास सुरूवात केली. खुद्द भारतीय संघाचा कर्णधारच साफसफाई करायला लागल्याचे दिसताच एक अधिकारी तेथे धावत गेला. ' पण आम्ही कचरा केला आहे, त्यामुळे आम्हीच तो उचलायला हवा,' असे सांगत विराटने आपली सफाई मोहिम सुरूच ठेवली. 
काही दिवसांपूर्वीच गांधीजयंतीनिमित्त विराटने इतर खेळाडूंसोबत ईडन गार्डन्स स्टेडियमच्या स्टँड्समध्ये सफाई केली होती. मात्र सफाईचा हा मंत्र केवळ एका दिवसापुरता नव्हे तर रोजच्या जीवनात आचरणात आणला पाहिजे हे विराटने होळकर स्टेडियमवरील कृतीने दाखवून दिलं. 
विशेष म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विराटचे कौतुक केले. ' तुझ्या या छोट्याशा मात्र महत्वपूर्ण कृतीमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल' असे ट्विट करत मोदींनी विराटला शुभेच्छा दिल्या.
 
 
त्यानंतर विराटनेही पंतप्रधानांचे आभार मानले. ' देशात (चांगला) बदल घडवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयतन करत आहोत. तुमच्याकडूनच आम्हाला प्रेरणा मिळाली' असेही विराटने नमूद केले. 

Web Title: PM Narendra Modi praises Virat ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.