अवलिया..कोहलीसाठी विकले आईचे दागिने
By admin | Published: January 23, 2017 04:23 PM2017-01-23T16:23:41+5:302017-01-23T16:23:41+5:30
भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ज्या आक्रमकतेने खेळतो ते पाहणे आल्हाददायक असते. कोहलीचे करोडो फॅन्स आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - सुधीर गौतमचे नाव ऐकल्यास डोळ्यासमोर येतो सचिन तेंडुलकर. सुधीरने सचिनची मॅच पाहण्यासाठी आपल्या लग्नाची तारीख पुढे ठकलली होती. तसेच सध्याच्या काळात भारताचा कर्णधार विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ज्या आक्रमकतेने खेळतो ते पाहणे आल्हाददायक असते. कोहलीचे करोडो फॅन्स आहेत. मैदानावर मुलीने त्याला लग्नाची मागणी घातलेली तुम्हाला आठवत असेलच.
काही फॅन असेच असतात आपल्या आवडत्या खेळाडूसाठी काहीही करायला तयार होतात. विराटच्या फॅन्सच्या यादीत आता नवे नाव समोर आले आहे. हे नाव म्हणजे निकाष कन्हारचं आहे. मूळचा ओरिसाचा असलेला निकाष भारताचा विराट कोहलीचा कट्टर चाहता आहे. कोहलीला पाहायला तो देशभर जिथे जिथे भारताचे सामने असाता तिथे हजर राहतो. निकाष कन्हार कोहलीचा एवढा मोठा चाहता आहे की कोलकाता सामन्याचे टिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते म्हणून त्याने आईचे दागिने विकले. ईडन गार्डन्समध्ये आताच झालेल्या मॅचच्या वेळेसही निकाष स्टेडियममध्ये दिसला होता.
आपल्या देशात अवलिये, ध्येयवेडे खोऱ्याने सापडतात. एखाद्या वेडापायी सगळंकाही विसरणं एकवेळ ठीक ठरेलही. पण आईचे दागिने विकत, घरातल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करत देशभर भटकण किती योग्य आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी-20 सामना भारताने जिंकल्यानंतर पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतातील उमर अलाझ नावाच्या कोहलीच्या समर्थकानं त्याच्या घरावर तिरंगा फडकावला होता. त्यानंतर तक्रार आल्यानं उमरला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.या प्रकरणी उमरला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.