मोहितच्या विश्वविक्रमी खेळीचे रहस्य... छोटे मैदान
By Admin | Published: February 8, 2017 11:50 PM2017-02-08T23:50:22+5:302017-02-08T23:50:22+5:30
दिल्लीचा क्रिकेटपटू मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून नवा विक्रम नोंदविला. टी-२० क्रिकेटमधील कुठल्याही स्तरावर असा भीमपराक्रम
नवी दिल्ली : दिल्लीचा क्रिकेटपटू मोहित अहलावत याने टी-२० क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावून नवा विक्रम नोंदविला. टी-२० क्रिकेटमधील कुठल्याही स्तरावर असा भीमपराक्रम करणारा मोहित जागतिक क्रिकेटमध्ये पहिलाच खेळाडू ठरला. केवळ ७२ चेंडूंत ३९ षटकार आणि १४ चौकारांसह ३०० धावा ठोकणाऱ्या यशाचे रहस्य छोट्या मैदानात दडले होते, हे सत्य आता पुढे आले.
नवी दिल्लीतील ललिता पार्क मैदानावर फ्रेन्ड्स प्रीमियर लीगमध्ये मावी इलेव्हन आणि फ्रेन्ड्स इलेव्हन यांच्यातील सामन्यादरम्यान मोहितने हा विक्रम केला. मात्र त्याने ज्या मैदानावर ही विक्रमी खेळी केली ते मैदान आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी असलेल्या मैदानांच्या तुलनेत अगदीच छोटे होते. मैदान लहान असल्यामुळे मोहितला हा विक्रम करता आला. मोहितने ज्या मैदानावर ही कामगिरी केली त्या मैदानाची सीमारेषा केवळ ४० यार्ड इतकीच आहे.
आंतरराष्ट्रीय सामने ज्या मैदानावर खेळविले जातात त्या मैदानावर सीमारेषा साधारणत: ६५ ते ७० यार्ड इतक्या अंतरावर असते. जगातील अनेक मैदानांवरील सीमारेषा ७५ यार्डदेखील आहे. मोहितचा
झंझावात मात्र नजरेआड करण्यासारखा नाही. (वृत्तसंस्था)
सामन्यात इतर खेळाडूंना जी कामगिरी करता आली नाही, ते मोहितने करून दाखविले हे विशेष.