फुटबॉल ‘हेडर’ मेंदूसाठी धोकादायक

By Admin | Published: February 16, 2017 12:11 AM2017-02-16T00:11:20+5:302017-02-16T00:11:20+5:30

व्यावसायिक फुटबॉलपटू हेडरचा खेळात मोठ्या प्रमाणावर वापर करतात, अशा खेळाडूंना आयुष्यात स्मृती गमवावी लागू शकते.

Football 'Headers' Dangerous for the Brain | फुटबॉल ‘हेडर’ मेंदूसाठी धोकादायक

फुटबॉल ‘हेडर’ मेंदूसाठी धोकादायक

googlenewsNext

लंडन : व्यावसायिक फुटबॉलपटू हेडरचा खेळात मोठ्या प्रमाणावर वापर करतात, अशा खेळाडूंना आयुष्यात स्मृती गमवावी लागू शकते. एका नव्या शोधातील हा निष्कर्ष आहे.
युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ लंडन आणि कार्डिफ विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नाने अभ्यास करण्यात आला. या शोधकार्यात पाच लोकांच्या मेंदूच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली. पाचही जण व्यावसायिक फुटबॉलपटू होते. त्यातील एक तर आयुष्यभर हौशी फुटबॉल खेळला. सर्वजण सरासरी २६ वर्षांपर्यंत फुटबॉल खेळले व सर्वांनी वयाच्या ६० व्या वर्षी स्मृती गमावली.
शवविच्छेदन करताना वैज्ञानिकांना पाचपैकी चार मेंदूंमध्ये जखमा आढळून आल्या. ही एक प्रकारची मेंदूविकृती होती. त्यामुळे स्मृतिभ्रंश आणि स्मृतिलोप झाला. शरीर आणि डोक्याशी थेट संपर्क असलेल्या अन्य खेळांतही असे आढळून आले आहे.
शोधकर्ते प्रा. ह्यू मॉरिस म्हणाले, ‘आम्ही या खेळाडूंच्या मस्तिष्कांचा तपास केला, त्यावेळी अनेक बदल आढळून आले. माजी मुष्टियोद्धांमध्ये अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. वारंवार डोक्याला होणाऱ्या जखमांमुळे अशी लक्षणे आढळतात. वैद्यकीय भाषेत याला सीटीई असे संबोधले जाते.
‘अ‍ॅक्टा न्यूरोपॅथालॉजिका’ या पत्रिकेत प्रकाशित शोधवृत्तानुसार हा शोध फुटबॉल आणि स्मृतिलोप यांच्यात थेट संबंध असल्याचा निष्कर्ष काढत नसला तरी दीर्घकाळ डोक्याने हेडर मारणाऱ्या फुटबॉलपटूंनीकाय काळजी घ्यावी, यादृष्टीने आणखी शोध घेण्याची गरज असल्याचे मत नोंदविण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Football 'Headers' Dangerous for the Brain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.