डीआरएस वादात स्मिथच्या समर्थनार्थ स्टीव्ह वॉची बॅटिंग

By admin | Published: March 9, 2017 11:44 AM2017-03-09T11:44:13+5:302017-03-09T11:44:13+5:30

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने स्टीव्ह स्मिथ एक प्रतिष्ठित खेळाडू असून त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे

Steve Waugh's batting in support of DRS controversy Smith | डीआरएस वादात स्मिथच्या समर्थनार्थ स्टीव्ह वॉची बॅटिंग

डीआरएस वादात स्मिथच्या समर्थनार्थ स्टीव्ह वॉची बॅटिंग

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळण्यात आलेल्या टेस्ट सीरिजमधला डीआरएस वाद चांगलाच चिघळला चालला असून वाद शमण्याची काही चिन्हे दिसत नाही आहेत. या प्रकरणात आता दोन्ही देशातील क्रिकेट दिग्गजांनीही उडी घेण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने स्टीव्ह स्मिथ एक प्रतिष्ठित खेळाडू असून त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे. स्टीव्ह स्मिथने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे पाहणं आपली चुकून पाहिल्याचं सांगितलं आहे. तसंच ती आपली घोडचूक असल्याचंही कबूल केलं आहे. 
 
(डीआरएस वादावरून आता बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया आमनेसामने)
(...म्हणून स्टिव्ह स्मिथवर भडकला विराट कोहली)
(भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वाद)
 
दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना स्टीव्ह वॉने सांगितलं की, 'तो एक जबरदस्त सामना होता, पण सर्वांचं लक्ष एकाच घटनेवर केंद्रीत आहे ही गोष्ट लाजिरवाणी आहे. स्टीव्ह स्मिथची प्रतिष्ठा पाहता तो जे काही सांगेल त्याचा मी स्विकार करेन. एक चांगलं झालं की पंचांनी मध्यस्थी करत परिस्थिती चिघळण्यापासून रोखलं. स्मिथ आपल्या करिअरमध्ये जेव्हा कधी मागे वळून पाहिल तेव्हा नक्कीच त्याला हे लाजिरवणां वाटेल, त्याने नक्कीच यातून धडा शिकायला हवा'. 
 
आयसीसीने मध्यस्थी करत हे प्रकरण मिटवावं अशी मागणीही स्टीव्ह वॉने केली आहे. 'आयसीसीने या प्रकरणात लक्ष घालत संपवण्याची गरज आहे. आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आपण सतर्क राहिलं पाहिजे. हा एक रोमांचक सामना होता', असं स्टीव्ह वॉ बोलले आहेत.
 
दुसरीकडे भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) कर्णधार विराट कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे पाहून संकेत स्वीकारले ही त्याची चूक होती की काय, याची शहानिशा करण्यासाठी चौकशी नियुक्त करावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) केली आहे.
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथवरील खोटारडेपणाचे आरोप फेटाळल्यानंतर बीसीसीआयने कोहलीच्या समर्थनार्थ वादात उडी घेतली आहे. बीसीसीआयच्या मते, या सर्व प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर टीम इंडिया आणि कर्णधार कोहली यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विराट परिपक्व आणि अनुभवी खेळाडू आहे. मैदानावर त्याची वागणूक फारच आक्रमक असते. आयसीसी एलिट पंच नायजेल लोंग यांनीदेखील मैदानावरील कोहलीच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यांनीच स्टीव्ह स्मिथ याला ड्रेसिंग रूमकडून इशारा घेण्यापासून रोखले.’ आयसीसीने या प्रकरणाचा तपास करावा आणि दोषींवर कारवाई करावी, असे बीसीसीआयला वाटते. उर्वरित दोन्ही कसोटी सामने खेळ भावनेने खेळले जातील, अशी अपेक्षादेखील व्यक्त केली.
 
स्टीव्ह स्मिथने पत्रकारांसोबत बोलताना ती माझी घोडचूक होती, असे कबूल केले आहे. आयसीसीने या प्रकरणाची शहानिशा करायला हवी. पुढील दोन सामने खेळभावनेने खेळू, अशी ग्वाहीदेखील स्मिथने दिल्याचे बीसीसीआयने वक्तव्यात नमूद केले.
 

Web Title: Steve Waugh's batting in support of DRS controversy Smith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.