VIDEO : कांगारुंचे शेपूट वाकडेच, मॅक्सवेलकडून कोहलीच्या दुखापतीची खिल्ली
By admin | Published: March 19, 2017 02:22 AM2017-03-19T02:22:14+5:302017-03-19T08:30:46+5:30
अष्टपैलू फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी यजमान संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीची खिल्ली उडवली.
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 19 : भारत आणि आॅस्ट्रेलिया क्रिकेट संघांदरम्यान मैदानावरील वाद आजही कायम होते. अष्टपैलू फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी यजमान संघाचा कर्णधार विराट कोहलीला क्षेत्ररक्षण करताना खांद्याला झालेल्या दुखापतीची खिल्ली उडवली.
गुरुवारी सामन्याच्या पहिल्या दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्याच्या सामन्यात खेळण्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. खांद्याला हाताचा आधार देत तो मैदानातून परतला होता. स्कॅननंतर स्नायू ताणल्या गेले असल्याचे स्पष्ट झाले. त्याने ४०० मिनिटे क्षेत्ररक्षण केले नाही. त्यात दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा समावेश आहे.
भारतीय कर्णधार आज मात्र फलंदाजीला आला. तो केवळ सहा धावा काढून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. शुक्रवारी शानदार शतकी खेळी करणारा मॅक्सवेल आज कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवत असल्याचे निदर्शनास आले. त्याने भारतीय कर्णधाराच्या दुखापतीची नक्कल केली आणि ८१ व्या षटकात चौकार रोखल्यानंतर उठताना उजव्या खांद्याला हाताचा आधार दिला.
पुजाराने कमिन्सच्या गोलंदाजीवर फ्लिकचा फटका मारला. चेंडू सीमारेषेकडे जात असताना मॅक्सवेलने सूर मारत चेंडू थोपवला आणि उठताना कोहलीच्या दुखापतीची खिल्ली उडवली. कोहली मैदानाच्या त्याच भागात दुखापतग्रस्त झाला होता.
आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ डीआरएस रिव्'ू घेण्यासाठी ड्रेसिंग रुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले होते. त्यावर कोहलीने कडवी प्रतिक्रिया नोंदवली होती. सामन्यानंतर कोहलीने स्मिथला ‘लबाड’असल्याचे म्हटले नसले तरी पाहुण्या संघाचा कर्णधार रिव्'ूसाठी ड्रेसिंग रुमचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करीत होता, असा आरोप केला होता. दरम्यान, स्मिथने कोहलीचे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले होते.