भारत-पाक सामन्यादरम्यान गावस्कर जेव्हा माल्ल्यांना भेटतात

By Admin | Published: June 5, 2017 04:20 PM2017-06-05T16:20:21+5:302017-06-05T16:20:21+5:30

भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा प्रत्येकाची उत्सुकता जबरदस्त ताणलेली असते. हा हायव्होलटेज सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते.

When Gavaskar meets Mallyas during the Indo-Pak match | भारत-पाक सामन्यादरम्यान गावस्कर जेव्हा माल्ल्यांना भेटतात

भारत-पाक सामन्यादरम्यान गावस्कर जेव्हा माल्ल्यांना भेटतात

googlenewsNext

ऑनालइन लोकमत
लंडन, दि. 5 - भारत-पाकिस्तान हे पारंपारिक प्रतिस्पर्धी जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा प्रत्येकाची उत्सुकता जबरदस्त ताणलेली असते. हा हायव्होलटेज सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. याला कोणताच क्रिकेटप्रेमी अपवाद नाही. आताही एजबस्टन येथे सुरू असलेल्या सामन्यावेळीही हेच दिसून आले. भारतातील बँकांचे 9 हजार कोटी बुडवून लंडन गाठलेल्या विजय मल्ल्यालाही भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या सामन्याबाबतची उत्सुकता लपवता आली नाही. भारतातून पसार झालेला हा उद्योगपती इंग्लंडमध्येही कोणाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यास आवर्जून उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

भारत-पाक सामन्यादरम्यान विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्कर यांची भेट झाल्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यावरून नेटिझन्सने विजय मल्ल्या आणि सुनिल गावस्करांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मल्ल्यांच्या भेटीमुळे सुनिल गावस्करवर नेटीझन्सने नाराजी व्यक्त करताना टीकेची झोड उडवली आहे. विजय मल्ल्यांच्या भेटीवर सुनिल गावस्कर यांनी अद्याप मौन बाळगले आहे. यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.



भारतातील बँकांचे जवळपास 9 हजार कोटी रुपये बुडवून माल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. एप्रिलमध्ये माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर काही वेळातच त्याची जामिनावर सुटकाही करण्यात आली होती.
दरम्यान, दिल्लीतील विशेष न्यायालयाने परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी माल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. 2016 मध्ये विजय मल्ल्याने ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु होते. फेब्रुवारी 2017 मध्ये भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती.केंद्र सरकारने विजय मल्ल्याचा पासपोर्टही रद्द केला होता.याशिवाय त्याच्याविरोधात एक हजार पानांचे आरोपपत्रही दाखल झाले आहे.

Web Title: When Gavaskar meets Mallyas during the Indo-Pak match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.