सोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट

By admin | Published: June 13, 2017 03:29 PM2017-06-13T15:29:22+5:302017-06-13T16:52:26+5:30

15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Bangladeshi felon on social media, objectionable post on ViratSena | सोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट

सोशल मीडियावर बांगलादेशी चाहत्यांचा उच्छाद, विराटसेनेवर केल्या आक्षेपार्ह पोस्ट

Next

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 13 - पावसाच्या कृपेमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशला प्रवेश मिळाला. बांगलादेशची ही आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला. 15 तारखेला भारताविरोधात दोन हात करणार आहे. त्यापूर्वीच बांगलादेशच्या चाहत्यानंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एक प्रकारे त्यांनी अक्षेपार्ह पोस्ट करत आपली लायकी दाखवली आहे. सोशल मीडियावर भारतीय चाहत्यांनीही त्यांना भारताचा रेकॉर्ड सांगत जागा दाखवून दिली आहे.
सेमीच्या लढाईपूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टर्सचा उच्छाद मांडला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, धोनीसह सर्वच संघाचे अक्षेपार्ह पोस्टर्स बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यापूर्वी, आशिया कप दरम्यानही बांगलादेशी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे आक्षेपार्ह पोस्टर व्हायरल केले होते. यामध्ये तस्किन अहमदच्या हातात धोनीचे मुंडक असा वादग्रस्त फोटो पोस्ट केला होता. मात्र टीम इंडियाने त्या सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारुन पोस्टरला चोख उत्तर दिलं होतं.

आणखी वाचा : तस्कीन अहमदच्या हातात धोनीचं मुंडक असलेलं आक्षेपार्ह पोस्टर सोशल मिडियावर व्हायरल

मिरपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बांगलादेशी चाहते करु इच्छित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बांगलादेशच्या या उच्छादाला टीम इंडियाने आपल्या कामगिरीने उत्तर दिलं होतं.

Web Title: Bangladeshi felon on social media, objectionable post on ViratSena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.