मी नेहमीच ड्रेसिंग रुममधील पावित्र्य राखलं, विराट कोहलीचा कुंबळेवर निशाणा
By admin | Published: June 23, 2017 03:19 PM2017-06-23T15:19:30+5:302017-06-23T15:23:09+5:30
मी कधीच ड्रेसिंग रुममध्ये काय घडले, याचा खुलासा करणार नाही, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले
Next
ऑनलाइन लोकमत
पोर्ट ऑफ स्पे, दि. 23 - "अनिल भाईंनी आपलं मत व्यक्त केलं असून त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो", असं भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बोलला आहे. अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रथमच विराट कोहलीने यावर भाष्य केले. अनिल कुंबळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या राजीनाम्याचं कारण सांगितलं होतं. त्यानंतर विराट कोहलीवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली होती. मात्र अद्यापपर्यंत विराट कोहलीने यावर भाष्य केले नव्हते.
"चॅम्पिअन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडल्यानंतर लगेचच हे सर्व घडलं. चॅम्पिअन्स ट्रॉफीदरम्यान माझ्या एकूण 11 पत्रकार परिषद झाल्या. चेंजिंग रुममध्ये जे काही होतं त्याचं पावित्र्य राखण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गेल्या 3 ते 4 वर्षात आम्ही एक कल्चर निर्माण केलं आहे. सर्व संघाचा यावर विश्वास असून आमच्यासाठी ते सर्वश्रेष्ठ आहे. मी नेहमी याचा आदर केला असून सातत्य राखण्याचा प्रयत्न करत आहोत", असं विराट कोहलीने सांगितलं आहे.
"मी एक क्रिकेटर म्हणून नेहमीच त्यांचा आदर करतो. त्यांनी देशासाठी जे केलं आहे, जे मिळवलं आहे ते त्यांच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही", असंही विराटने यावेळी सांगितलं.
#WATCH: Indian skipper Virat Kohli says, he respects Anil Kumble"s decision and what Kumble has done for the nation as a cricketer. pic.twitter.com/pdrReAJLB8
— ANI (@ANI_news) June 23, 2017
अनिल कुंबळे यांच्यासोबतच्या वादावर सविस्तर चर्चा करण्यापेक्षा सध्या आपलं संपुर्ण लक्ष वेस्ट इंडिज दौ-यावर देणार असल्याचंही विराटने यावेळी स्पष्ट केलं आहे. राजीनामा देणारे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधारासोबतचे संबंध अस्थिर झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबाबत बोलताना कोहलीने वरील वक्तव्य केले.
What happens in change room is something sacred & private to all of us, something that I wouldn"t express in detail in public: Virat Kohli pic.twitter.com/sXhRuSwsom
— ANI (@ANI_news) June 23, 2017
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत पाकिस्तानकडून झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाचं मनौधेर्य खचलं असताना अनिल कुंबळेने संघाला पाठिंबा देण्याऐवजी चांगलंच झाडलं. आधीच पराभवामुळे खच्ची झालेल्या संघाला प्रशिक्षक आपल्याला खेळाडूप्रमाणे न वागवता, लहान मुलांप्रमाणे वागवत असल्याचं वाटत होतं. ज्याप्रकारे अनिल कुंबळे यांनी खेळाडूंशी संवाद साधला, त्यावरुन विराट कोहली नाराज झाला होता.
Anil bhai (Anil Kumble) has expressed his views and has taken a decision to step out, we all respect that decision: Virat Kohli pic.twitter.com/p6PhF4Z21O
— ANI (@ANI_news) June 23, 2017
भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप अनिल कुंबळेने पायउतार होताना केला आहे. फेसबूक आणि ट्विटरवर एक पोस्ट करत जंबोने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये जंबो म्हणतो, गेले वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं काल पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे.
कुंबळेंनी पुढे म्हटले, बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो.
दोघांमध्ये अनेक गोष्टींवरुन वाद सुरु होते. विशेष म्हणजे दोघांमध्येही गेल्या सहा महिन्यांपासून अबोला होता. कोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.