"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा

By Admin | Published: July 9, 2017 09:09 PM2017-07-09T21:09:00+5:302017-07-09T21:40:45+5:30

वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे.

The announcement of the Viraatas for "Sri Lanka" | "लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा

"लंकादहन"साठी विराटसेनेची घोषणा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - वेस्ट इंडिज विरोधातील वनडे मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघ 26 जुलैपासून श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. तीन कसोटी सामन्यासाठी 16 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. के. एल. राहुलचे संघात पुनरागमन झाले आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आली आहे.

श्रीलंकेच्या दौऱयात भारतीय संघ तीन कसोटी, 5 वनडे व 1 टी-20 सामना खेळणार आहे. त्याआधी दोन्ही संघांसाठी दोन सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 21 व 22 जुलै रोजी हे सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील पहिली कसोटी 26 जुलैपासून कँडी येथे, दुसरी कसोटी 3 ऑगस्टपासून गॅले तर तिसरी व शेवटची कसोटी 12 ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. 20 ऑगस्टपासून वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबररोजी कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे.

मायदेशात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय संघाची ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. यामुळे या मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अनिल कुंबळे यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही सूत्रे कोणाकडे जातात व नवीन प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.

असा आहे भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, के.एल.राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहीत शर्मा,रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), इशांत शर्मा, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,कुलदीप यादव आणि अभिनव मुकुंद.

भारतीय संघाचा संपूर्ण श्रीलंका दौरा 

कसोटी मालिका -
पहिली कसोटी 26 ते 30 जुलै गॅले
दुसरी कसोटी 3 ते 7 ऑगस्ट कोलंबो
तिसरी कसोटी 12 ते 16 ऑगस्ट पल्लीकल

वनडे मालिका -
पहिली वनडे 20 ऑगस्ट डाम्बुला
दुसरी वनडे 24 ऑगस्ट पल्लीकल
तिसरी वनडे 27 ऑगस्ट पल्लीकल
चौथा वनडे 31 ऑगस्ट कोलंबो
पाचवी वनडे 3 सप्टेंबर कोलंबो

टी-20 मालिका -
एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबर कोलंबो

Web Title: The announcement of the Viraatas for "Sri Lanka"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.