झिम्बाब्वेने मालिका जिंकली

By admin | Published: July 11, 2017 01:58 AM2017-07-11T01:58:06+5:302017-07-11T01:58:06+5:30

झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली.

Zimbabwe win series | झिम्बाब्वेने मालिका जिंकली

झिम्बाब्वेने मालिका जिंकली

Next

हंबनटोटा : आॅफ स्पिनर सिकंदर रजाच्या शानदार फिरकीनंतर सलामीवीर हॅमिल्टन मसाकद्जा याने झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने पाचव्या व अंतिम एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेला ३ विकेट्सने नमवून मालिका ३-२ अशी जिंकली. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने गेल्या आठ वर्षात पहिल्यांदा विदेशामध्ये मालिका जिंकली आहे.
श्रीलंकेन दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने हॅमिल्टनच्या ७३ धावांच्या खेळीच्या जोरावर बाजी मारली. हॅमिल्टनने ८६ चेंडूत ९ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. त्याच्याशिवाय सोलोमन मायर (४३) याच्यासह ९२ धावांची सलामी करत हॅमिल्टनने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर हॅमिल्टन - तारिसाई मुसाकांदा (३७) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. झिम्बाब्वेने फलंदाजांच्या जोरावर ३८.१ षटकात ७ बाद २०४ धावा काढल्या. सामनावीर ठरलेल्या रजाने अंतिम क्षणी महत्त्वपुर्ण खेळी करताना २७ चेंडूत एक चौकार व दोन षटकारांसह नाबाद २७ धावा चोपल्या. तत्पूर्वी, रजाच्या (३/२१) भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा डाव मर्यादित राहिला. ग्रीम केमरनेही (२/२३) चांगला मारा करुन लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवले. सलामीवीर धनुष्का गुणतिलका (५२) आणि असेला गुणरत्ने (नाबाद ५९) यांच्याव्यतिरिक्त इतर फलंदाजांना छाप पाडण्यात अपयश आले. एकवेळ लंकेची ४२व्या षटकात ८ बाद १५३ धावा अशी अवस्था होती. परंतु, गुणरत्ने आणि दुष्मंता चमीरा (नाबाद १८) यांनी नवव्या विकेटसाठी नाबाद ५० धावांची भागीदारी करुन संघाला दोनशेच्या पुढे मजल मारुन दिली.

Web Title: Zimbabwe win series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.