आफ्रिकेचा दणदणीत विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 03:17 AM2017-07-18T03:17:34+5:302017-07-18T03:17:34+5:30

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडला ३४० धावांनी लोळवले. या शानदार विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१

Africa's winning sound | आफ्रिकेचा दणदणीत विजय

आफ्रिकेचा दणदणीत विजय

Next

नॉटिंगहॅम : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत दणदणीत विजय मिळवताना इंग्लंडला ३४० धावांनी लोळवले. या शानदार विजयासह आफ्रिकेने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पाहुण्या आफ्रिका संघाने भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडला नांगी टाकण्यास प्रवृत्त केले. सामन्याच्या चौथ्याच दिवशी आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित केला होता. आफ्रिकेने दिलेल्या ४७४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव केवळ १३३ धावांत संपुष्टात आला.
इंग्लंडकडून दुसऱ्या डावात केवळ सलामीवीर अ‍ॅलिस्टर कूक (४२) याने आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याला तोंड दिले. त्याव्यतिरिक्त मोइन अली (२७), बेन स्टोक्स (१८), जॉनी बेयरस्टो ९१६) यांनी काहीप्रमाणात झुंज देण्याचा अपयशी प्रयत्न केला. या फलंदाजांचा अपवाद वगळता इतर कोणताही फलंदाज आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीपुढे तग धरु शकला नाही. ख्रिस मॉरिस, केशव महाराज आणि वेनर्ॉन फिलेंडर यांनी भेदक व अचूक मारा करताना इंग्लंड संघाला बॅकफूटवर टाकले. यामुळे दक्षिण आफ्रिकेला सामना एकतर्फी जिंकता आला. फिलेंडर आणि महाराज यांनी प्रत्येकी ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिडार पाडले. तसेच मॉरिस आणि डूआने आॅलिव्हर यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने आपल्या दुसऱ्या डावामध्ये डीन एल्गर (८०), हाशिम आमला (८७) आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस (६३) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ९ बाद ३४३ धावांची मजबूत मजल मारली.
सामन्यात शानदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या फिलेंडरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. (वृत्तसंस्था)

पहिल्या डावात १३० धावांची आघाडी
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या आफ्रिकेने पहिल्या डावात ३३५ धावा उभारल्या होत्या. हाशिम आमला (७८), क्विंटन डीकॉक (६८) आणि फिलेंडर (५४) यांनी अर्धशतक झळकावत संघाला समाधानकारक मजल मारुन दिली होती. यानंतर इंग्लंडचा डाव २०५ धावांत संपुष्टात आणून आफ्रिकेने १३० धावांची महत्त्वपुर्ण आघाडी घेतली होती.

धावफलक : द. आफ्रिका (पहिला डाव): ९६.२ षटकात सर्वबाद ३३५ धावा (हाशिम आमला ७८, क्विंटन डीकॉक ६८, वनॉन फिलेंडर ५४; अँडरसन ५/७२, स्टुअर्ट ब्रॉड ३/६४) आणि (दुसरा डाव) : १०४ षटकात ९ बाद ३४३ धावा (डीन एल्गर ८०, हाशिम आमला ८७, डू प्लेसिस ६३; मोइन अली ४/७८) वि.वि. इंग्लंड (पहिला डाव) : ५१.५ षटकात सर्वबाद २०५ धावा (जो रुट ७८, जॉनी बेयरस्टो ४५; केशव महाराज ३/२१, ख्रिस मॉरिस ३/३८) व (दुसरा डाव) : ४४.२ षटकात सर्वबाद १३३ धावा (कूक ४२; वनर्ॉन फिलेंडर ३/२४, केशव महाराज ३/४२)

Web Title: Africa's winning sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.