भारतीय क्रिकेटपटूंमुळे देशाची मान शरमेने झुकली - सुनील गावस्कर

By admin | Published: August 18, 2014 10:48 AM2014-08-18T10:48:35+5:302014-08-18T12:59:56+5:30

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत महेंद्रसिंग धोनी व इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताची मान शरमेने झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी केली आहे.

Indian cricketer succumbed to shame by Sunil Gavaskar - Sunil Gavaskar | भारतीय क्रिकेटपटूंमुळे देशाची मान शरमेने झुकली - सुनील गावस्कर

भारतीय क्रिकेटपटूंमुळे देशाची मान शरमेने झुकली - सुनील गावस्कर

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत महेंद्रसिंग धोनी व इतर भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताची मान शरमेने झुकली आहे, अशी खरमरीत टीका माजी कप्तान सुनील गावस्कर यांनी केली आहे. 'ज्या खेळाडूंना कसोटी क्रिकेट खेळण्यात रस नाही, त्यांनी कसोटी संघातून बाहेर पडले पाहिजे,' असा सल्लाही त्यांनी खेळाडूंना दिला आहे. 
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारताने १-३ अशी गमावल्याने चहुबाजूंनी भारतीय संघावर टीका होत आहे. ओल्ड ट्रॅफर्डपाठोपाठ भारतीय संघाने ओव्हलमध्ये अत्यंत खराब कामगिरी केल्याने पाचव्या कसोटी सामन्यातही भारताल लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. 
भारताच्या या खराब कामगिरीबाबत बोलताना सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमात भारतीय संघाला कठोर शब्दांत फटकारले. 'जर तुम्हाला देशासाठी कसोटी लसामने खेळायची इच्छा नसेल तर संघातून बाहेर पडा, फक्त मर्यादित षटकांचेच सामने खेळा. खराब कामगिरी करून तुम्ही देशाची मान झुकवली आहे, हे योग्य नाही' अशा कठोर शब्दांत त्यांनी धोनी व टीमवर टीका केली. 
या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी इंग्लंडच्या संघाचे कौतुकही केली. 'या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी प्रत्येक बाबतीत सरस होती. मात्र असे असले तरीही त्यांनी या विजयाने हुरळून जाता कामा नये, कारण यापुढे त्यांचीही कसोटी असेल' असे ते म्हणाले.
 

Web Title: Indian cricketer succumbed to shame by Sunil Gavaskar - Sunil Gavaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.