WTA फायनल, सानिया - हिंगिस जोडीने पटकावले विजेतेपद

By admin | Published: November 1, 2015 03:27 PM2015-11-01T15:27:48+5:302015-11-01T15:27:48+5:30

डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस या जो़डीने स्पेनच्या जोडीचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

WTA Final, Sania - Hingis won the title of the championship | WTA फायनल, सानिया - हिंगिस जोडीने पटकावले विजेतेपद

WTA फायनल, सानिया - हिंगिस जोडीने पटकावले विजेतेपद

Next

ऑनलाइन लोकमत

सिंगापूर, दि. १ - डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस या जो़डीने स्पेनच्या जोडीचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सानिया - हिंगिस या जोडीचे यंदाच्या वर्षातील हे नववे विजेतेपद आहे.

टेनिसमध्ये ग्रँडस्लॅमनंतर डब्ल्यूटीए ही सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा व तिची सहकारी मार्टिना हिंगिस या जोडीने चमकदार कामगिरी करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात सानिया - हिंगिस जोडीसमोर स्पेनच्या गार्बाइन मुरुगुजा आणि कार्ला नुवारो या जोडीचे आव्हान होते. सानिया - हिंगिस जोडीने प्रतिस्पर्धी जोडीचा ६-०, ६-३ असा सहज पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 

Web Title: WTA Final, Sania - Hingis won the title of the championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.