मोदी देश अन् संघ संसद नव्हे
By Admin | Published: April 15, 2016 02:53 AM2016-04-15T02:53:06+5:302016-04-15T02:53:06+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमीवर भेट देण्यासाठी आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी ....
नागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त दीक्षाभूमीवर भेट देण्यासाठी आलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात विशिष्ट विचारसरणीला लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही अन् संघ म्हणजे संसद नाही. संघाचा गणवेश बदलला असला तरी दृष्टिकोन बदललेला नाही, असे त्याने प्रतिपादन केले.
बजरंग दलाचा गोंधळ
कन्हैया कुमार गुरुवारी सकाळी नागपूर विमानतळावर दाखल झाला. विमानतळावरून गाडीने निघाल्यावर काही मीटर अंतरावरच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला व दगडफेक केली. प्रत्यक्ष सभा सुरू असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’चे नारे लावत गोंधळ घालायला सुरुवात केली. कन्हैयासमर्थक संघटनेच्या विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला व सभागृहातच हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी तत्काळ धाव घेत गोंधळ करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळातच कन्हैयावर मंचावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने जोडा फेकला. उपस्थित कार्यकर्त्यांकडून त्याला मारहाण होत असताना पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.