महाराष्ट्रातून ४ स्वतंत्र राज्ये निर्माण करा - मा.गो.वैद्य
By admin | Published: January 14, 2017 08:29 PM2017-01-14T20:29:59+5:302017-01-14T20:29:59+5:30
आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - आपल्या देशात राज्यांमध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड असमानता असल्याचे दिसून येते. त्यामुळेच ३ कोटींच्या लोकसंख्येप्रमाणे राज्यांची निर्मिती करायला हवी. यामुळे सुलभ राज्यप्रशासन होऊ शकते. या हिशेबाने महाराष्ट्रातून विदर्भासह ४ स्वतंत्र राज्य निर्माण होऊ शकतात, असे प्रतिपादन संघाचे ज्येष्ठ विचारक मा.गो.वैद्य यांनी केले.
विदर्भ राज्य निर्मितीसाठी लढणा-या सर्व विदर्भवादी संघटनांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘विदर्भ मिरर’ या साप्ताहिकाची सुरुवात करण्यात आली आहे. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने परत जोर धरला आहे. मुळात चांगला व सुरळीत राज्यकारभार चालावा यासाठी लहान राज्यांची आवश्यकता असते.
आपल्या देशात उत्तरप्रदेशची लोकसंख्या २० कोटींच्या जवळ आहे तर दुसरीकडे सिक्कीम राज्याची लोकसंख्या ६ लाख १० हजार आहे. त्यामुळे देशात समान लोकसंख्येच्या आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याची गरज आहे. यासाठी केंद्राने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली पाहिजे, असे मा.गो.वैद्य म्हणाले.देशात छत्तीसगड वगळता सर्व लहान राज्यांच्या निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला. मुळात राज्यांची निर्मिती ही आंदोलनाशिवायच झाली पाहिजे, असेदेखील वैद्य म्हणाले.