Apple iPhone Event: जाणून घ्या iPhone चा 10 वर्षांचा संपूर्ण प्रवास
By सागर सिरसाट | Published: September 12, 2017 06:45 PM2017-09-12T18:45:47+5:302017-09-12T18:45:47+5:30
मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स.
मुंबई, दि. 12 - मोबाइल फोन्सच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपल iPhone ला यंदा 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने अॅपल iPhone X हा खास फोन लाँच होण्याची शक्यता आहे. याशिवाय iPhone 8, iPhone 8 प्लस हे फोन बहुप्रतिक्षित फोन देखील लॉन्च होणार आहेत. 2007 साली अॅपलने सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पहिला-वहिला iPhone लॉन्च केला होता. त्यावेळी अॅपलचे सीईओ होते स्टीव्ह जॉब्स. टचस्क्रीनसह 3.5 इंच डिस्प्ले असलेला हा जगातला पहिला स्मार्टफोन होता. पहिल्या वर्षी अॅपलने या फोनच्या 61 लाख युनिटची विक्री केली होती. 2008 या वर्षी iphone ने 3G मोबाईल नेटवर्क आणि GPS ची जगाला ओळख करून दिली. अॅप स्टोअर आणि थर्ड-पार्टी अॅप इंटिग्रेशनचंही हे पहिलं वर्ष होतं.
iphone चा आतापर्यंतचा प्रवास-
1st Generation: नोव्हेंबर 2007 मध्ये इंग्लंडमध्ये लॉन्च झाला. 3.5 स्क्रीन डिस्प्ले असलेला हा फोन त्यावेळचा सर्वात चांगला डिस्प्ले असलेला फोन होता. यामध्ये 8GB इंटरनल मेमरी तर 2 मेगापिक्सलचा कॅमेरा होता. त्यावेळी फोनमध्ये थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करता येत नव्हते.
3rd Generation: 2009 मध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला. iphone 3GS चं अपग्रेडेड व्हर्जन यावेळी देण्यात आलं होतं. मात्र, हा फोन जास्त लोकांच्या पसंतीस उतरला नाही. 3.2 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला हा फोन फोटो काढण्यासाठी चांगला होता, पण याची स्क्रीन केवळ 3.5 इंच इतकी होती. फोनमध्ये वॉइस कंट्रोलसोबत एक्स्ट्रा स्टोरेजचाही पर्याय देण्यात आला होता.
4th Generation: 2010 मध्ये iphone4 लॉन्च करण्यात आला. यामध्ये हाय रिझोल्यूशन असलेली रेटिना डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली होती जी 640 x 960 पिक्सेलला सपोर्ट करायची. फ्लॅट डिझाइन असलेल्या या फोनमध्ये HD व्हिडीओ रेकॉर्डींगला सपोर्ट करणारा 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा होता. या फोनने चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती.
5th Generation: 2011 मध्ये हा फोन लॉन्च कऱण्यात आला. लोकांचा वाढता प्रतिसाद हेरून कंपनीने जुन्या iphone 4 मध्ये S लावून iphone 4s लॉन्च केला. या फोनमध्ये HD व्हिडीओ रेकॉर्डींगला सपोर्ट करणारा 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला. फोनला जास्त फास्ट बनवण्यासाठी यामध्ये नवीन A5 प्रोसेसर लावण्यात आलं. यामध्ये ग्राफिक्स क्वालिटीसह ऑपरेटिंग सिस्टीम ios लाही अपग्रेड करण्यात आलं.
6th Generation: 2012 मध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला. यावेळी कंपनीने iphone 5 लॉन्च केला. यावेळी कंपनीने फोनच्या स्क्रीनवर जास्त मेहनत घेतली. फोनच्या स्क्रीनचा आकार वाढवून 4 इंच करण्यात आला. तसेच फोनमध्ये ios7 ला लॉन्च करण्यात आलं ज्यामुळे फोनची लोकप्रियता खूप वाढली.
7th Generation: सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने दोन मॉडेल iphone 5s आणि iphone 5c लॉन्च केले. दोन्ही मॉडेल दिसण्यास सारखेच होते मात्र, दोघांच्या किंमतीमध्ये फरक होता. iphone 5c कंपनीसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. फोनमध्ये ios7 अपडेटेड होतं. पावरफूल बॅटरीसह रिअर कॅमेराही होता याशिवाय फिंगरप्रिंटचंही ऑप्शन देण्यात आलं होतं.
8th Generation: सप्टेंबर 2014 मध्ये कंपनीने iphone6 आणि iphone 6plus लॉन्च केले. दोन्ही फोन फीचर्स आणि हार्डवेअरच्या बाबतीत दमदार होते. याफोनच्या विक्रीमुळेच कंपनी नंबर एक बनली. iphone 6 मध्ये 4.7 आणि iphone 6plus मध्ये 5.5 इंच इतकी स्क्रीन होती. दोन्ही फोनमध्ये A8 प्रोसेसर आणि 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला होता. बॅटरी व्यतिरीक्त दोन्ही फोनचे सर्व फीचर्स जवळपास सारखेच होते.
9th Generation: सप्टेंबर 2015 मध्ये कंपनीने iphone 6s आणि iphone 6splus लॉन्च केले. कपनीने दोन्ही फोनमध्ये दमदार प्रोसेसरचा वापर केला. A9 चिप लावण्यात आली, वायरलेस चिपच्या सहाय्याने फोनचा कनेक्टिव्हिटी स्पीड वाढवण्यात आला. कंपनीने यामध्ये 3D टच फीचरचा वापर केला, तसेच वाय-फाय आणि 4G चा स्पीडही वाढवला.
iphone 7 आणि iphone 7 plus : गेल्या वर्षी सप्टेंबर 2016 मध्ये कंपनीने हे दोन्ही फोन लॉन्च केले. सध्या या फोन्सचं क्रेझ पाहायला मिळत आहे. 32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध आहे. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस 4 GB रॅम देण्यात आला आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. एक स्पीकर वर असून दुसरा फोनच्या खाली आहे. यामध्ये रेटिना HD डिसप्ले आहे, जो आधीच्या आयफोनच्या तुलनेत 25 टक्के ब्राईट आहे. विशेष म्हणजे हे आयफोन 3D टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकतं. फोनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या आयफोनची बॉडी ग्लास आणि मेटलपासून बनवली आहे. दोन्ही फोनमध्ये आणखी एक नवं फीचर अॅड केलं आहे, ते म्हणजे दोन्ही आयफोन वॉटर आणि डस्ट प्रूफ आहेत.
iPhone 8, iPhone 8 + फीचर्स -
- वायरलेस चार्जिगची सुविधा असेल अशी चर्चा आहे.
- आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले
-‘होम बटण’ नसेल
-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित
- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल