"Apple iPhone Event : दशकपूर्तीनिमित्त अॅपलनं लाँच केले तीन आयफोन, घड्याळ आणि टिव्ही; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 09:01 AM2017-09-13T09:01:57+5:302017-09-13T09:01:57+5:30
मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले आहेत. जाणून घ्या किंमत आणि फिचर्स....
सॅन फ्रान्सिस्को, दि. 12 : मोबाइल फोनच्या जगातील बादशाह अशी बिरूदावली मिरवणा-या अॅपलनं आयफोनच्या दशकपूर्तीनिमित्त मंगळवारी आयफोन-8, आयफोन-8 प्लस आणि आयफोन एक्स हे तीन बहुप्रतिक्षित फोन लाँच केले आहेत. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात अॅपल मोबाइल मिळणार आहे. या सोहळ्यात आयफोनच्या मालिकेबरोबरच LTE सर्पोट असलेला अॅपल वॉच सीरिज 3 आणि 4 k अॅपल टीव्ही सेट टॉप बॉक्सही लाँच करण्यात आला आहे. तसेच यावेळी ARKit-पावर्ड गेम 'द मशीन' बाजारात आणला गेला.
गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोनप्रेमींना याची प्रचंड उत्सुकता होती. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी एका शानदार सोहळ्यात आयफोन लॉन्च करतानाच स्मार्ट वॉच आणि टिव्हीचंही अनावरण केलं. अॅपल वॉच जगात प्रथम क्रमांकावर असून, गेल्या तिमाहीत अॅपल वॉचच्या विक्रीत 50 टक्के वाढ झाली आहे. अॅपल वॉच वापरणारे जगातील 97 टक्के लोक समाधानी असल्याचे यावेळी कूक यांनी सांगितले.
(आणखी वाचा - सॅमसंगचा महत्त्वाकांक्षी गॅलक्सी 8 नोट भारतात दाखल)
लॉचिंगच्या कार्यक्रमापूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने या सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. पुढे म्हणाले की, आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल. एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे.
(आणखी वाचा - जाणून घ्या iPhone चा 10 वर्षांचा संपूर्ण प्रवास )
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानण्यासाठी टिम कुक सहाव्यांदा स्टेजवर आले. iPhoneX हा जगातील सर्वोकृष्ट स्मार्टफोन आहे, असा उल्लेख त्यांनी पुन्हा एखदा केला. यावेळी त्यांनी स्टिव जॉब्स यांची आठवण काढली. त्यांच्या मागे स्टीव यांचे प्रसिध्द वाक्य लिहिले होते. मी त्या आविष्कारावर विश्वास ठेवतो ज्यामध्ये लोक काहीतरी आश्यर्यकार वस्तू बनवून संपूर्ण मनुष्यजातीसाठी काहीतरी स्तूतीचे काम करून जातात.
या वर्षाअखेर पर्यंत अॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत. कुपेरटिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला.
(आणखी वाचा - एलजी जी 6 च्या मूल्यात घट, आयफोनच्या आगमनाआधी दर युद्ध सुरू)
जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ टीव्ही जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे.
जाणून घेऊयात फिचर्स आणि किंमत -
आयफोन एक्सची वैशिष्ट्ये -
- प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्द होण्यास सुरूवात होईल
- यफोन एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.
- आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा
- 64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल.
- वायरलेस चार्जिगची सुविधा
- मोबाईलकडे पाहिले तरी अनलॉक होणार
- नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल
- वॉटरप्रुफ
- ‘होम बटण’ नसेल
- फिंगर प्रिंट स्कॅनर’
- इन्फ्रारेड कॅमेरा (अंधारातही फोटो काढता येणार)
- ग्लास डिझाइन
- उत्कृष्ट फोटोग्राफी आणि 4K वीडिओग्राफी
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- ऑग्मेंटेड रिएलिटी फीचर
- FaceID उपलब्ध
- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले
iPhone 8, iPhone 8 + वैशिष्ट्ये -
- 15 सप्टेंबरपासून आयफोन बुकींग सुरु होणार आहे. तर 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असणार आहे.
- आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.
- आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा
- दोन्ही आयफोन 64 जीबी, 256 जीबीमध्ये उपलब्ध असणार
- नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल
- आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस मध्ये 12 मेगाफ्किसल कॅमेरा
- 7000 सीरिज अॅल्युमिनियम, लेजर वेल्डेड स्टिल आणि कॉपर स्ट्रक्चर
- वायरलेस चार्जिगची सुविधा
- आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले
-‘होम बटण’ नसेल
-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- डायनॅमिक रेंजसाठी न्यू कलर फिल्टरची सुविधा
- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल
- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले
अॅपलच्या टीव्हीचे नवे फिचर्स आणि वैशिष्ट्ये -
- 4K HDR अशी प्रणाली
- सध्या या अॅपल टीव्हीची किंमत 149 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे.
- 32 जीबी टीव्हीची 11462 रूपये आणि 64 जीबीची12742 रूपये
- एचडीआर 10, डॉल्बी व्हिजनला सर्पोट करणार
- हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो 22 सप्टेंबरपासून मिळेल.
- एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन क्षमता असेल.
- साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.
- नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील.
- अॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.
- तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.
- याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात.
वॉचची वैशिष्ट्ये
- २२ सप्टेंबर रोजी अॅपल वॉच सीरिज-३ मार्केटमध्ये उपलब्ध होणार
- कॉलही करता येणार
- तुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर अॅपल वॉच तुम्हाला सुचना देणार
- अॅपल वॉच तुमच्या हृदयाचे ठोके ही मोजणार
- चौपाटीवर जाताना किंवा वॉकिंगवर जाताना तुमचा मोबाइल घरी ठेऊन केवळ घड्याळ हातात घालून जाऊ शकता
- अॅपल वॉचमुळे प्रत्येकवेळी तुम्हाला आयफोन सोबत ठेवायची गरज नाही
- अॅपल सीरिज-३ वॉचमध्ये इलेक्ट्रॉनिक सिम असणार
- अॅपल वॉच - मध्ये 40 मिलियन गाणी संग्रहित करता येणार
- अॅपल सीरिज-३ वॉचमध्ये जलद वायफायसाठी डब्ल्यू२ चीप लावण्यात येणार
- सेल्यूलर आणि नॉन सेल्यूलर दोन्ही पर्यायात उपलब्ध.
- अॅपल वॉच सीरिज ३ सध्या तरी भारतात उपलब्ध येणार नाही.
- वायफायची सुविधा
- गुगल मॅप दाखवेल
- गाणे ऐकवेल
- वॉटरप्रुफ
- अॅपल वॉचमधील पहिल्या श्रेणीतील घडाळ्याची किंमत 249 डॉलर, दुसऱ्या श्रेणीची 329 डॉलर तर तिसऱ्या श्रेणीची 399 डॉलर ऐवढी असणार आहे. तिसऱ्या श्रेणीतील वॉच ही एकप्रकारे तुमचा मनगटावरील मोबाईलच असेल.