फेसबूकवर व्हायरल होतोय 'Sarahah', ओळख लपवून पाठवू शकता तुमचा संदेश

By शिवराज यादव | Published: August 12, 2017 11:21 AM2017-08-12T11:21:19+5:302017-08-12T11:24:59+5:30

आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे.

Becoming Viral on Facebook 'Sarahah', your message can be hidden by identifying | फेसबूकवर व्हायरल होतोय 'Sarahah', ओळख लपवून पाठवू शकता तुमचा संदेश

फेसबूकवर व्हायरल होतोय 'Sarahah', ओळख लपवून पाठवू शकता तुमचा संदेश

Next
ठळक मुद्देया अॅपच्या सहाय्याने तुम्ही तुमची ओळख उघड न करता कोणालाही संदेश पाठवू शकता आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहेसौदीमधील जैनुल आबेदिन या व्यक्तीने हे अॅप डेव्हलप केलं आहे

मुंबई, दि. 12 -  फेसबूकवर सध्या काही पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत असतील, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्यासंबंधी लिहिलेली एखादी पोस्ट शेअर केली असेल. त्या पोस्टखाली पाहिलंत तर तुम्हाला 'Sarahah.com' असं लिहिलेलं दिसेलं. हा नेमका काय प्रकार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्या माहितीसाठी हे एक अॅप असून प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत जवळपास 50 लाख लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. युजर्समध्ये या अॅपची क्रेझ वाढत चालली असून येणा-या काही दिवसांमध्ये फेसबूकवर अशा पोस्टचा भडिमार पडला तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. 

या अॅपची सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची ओळख उघड न करता कोणालाही संदेश पाठवू शकता. समोरच्या व्यक्तीला तुम्ही पाठवलेला मेसेज मिळेल, मात्र तो कोणी पाठवला हे कळणार नाही. अनेकदा एखाद्या व्यक्तीशी काहीतरी बोलायचं असतं, पण भीतीपोटी भावना व्यक्त होत नाहीत. अशा लोकांसाठी हे अॅप खूप फायद्याचं ठरत आहे. सौदीमधील जैनुल आबेदिन या व्यक्तीने हे अॅप डेव्हलप केलं आहे. 

तुम्हालाही Sarahah वापरायची इच्छा असेल तर सर्वात आधी त्यांच्या वेब प्लॅटफॉर्मवर जाऊन एक अकाऊंट बनवावं लागले. नाहीतर तुम्ही गुगल प्ले स्टोअरमधून किंना अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये जाऊन Sarahah अॅप डाऊनलोड करु शकता. या अॅपची iOS फाईल 22MB तर अॅड्रॉइडची अॅप साईज 12MB इतकी आहे. अनेक युजर्सनी या अॅपचं कौतुक केलं आहे, तर काहींना मात्र हे खटकत आहे. अनेकजण तर याचा वापर आपला राग काढण्यासाठी करताना दिसत आहेत. 

कसा करायचा वापर ?
अॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात आधी अकाऊंट तयार करा. त्यानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये आलेली मेसेज लिंक आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर करा. यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला आपोआप मेसेज मिळण्यास सुरुवात होईल. मात्र हे मेसेज तुम्हाला कोण पाठवत हे गुपीतच राहणार आहे. आणि हेच या अॅपचं वैशिष्ट्य आहे. 

हे अॅप ज्याप्रमाणे भावना व्यक्त करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म आहे, त्याचप्रमाणे याचे काही साईड इफेक्ट्सदेखील आहेत बरं का...म्हणजे यावर अनेक तरुण, तरुणी आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसत आहे. तशी यामध्ये काहीच अडचण नाही, मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर मात्र हा साईड इफेक्ट असू शकतो. अनेकजण तर नोकरी मागत आहेत. काहीजण आपल्या बॉसला तुम्ही इतके खडूस का आहात ? असा प्रश्न विचारत आहेत. याचा फायदा सेलिब्रेटिंनाही होत आहे. 

डाटा चोरी होण्याची शक्यता
सायबर एक्स्पर्ट आणि डाटा सेक्युरिटी क्षेत्रातील संबंधितांनी या अॅपमुळे सुरक्षेला धोका होण्याची भीती नाकारली जाऊ शकत नाही. हे अॅप फक्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचण्याची परवानगी जरी मागत असलं तरी यामुळे डाटा चोरी होण्याचं संकट येऊ शकतं. फक्त मौज-मजा म्हणून या अॅपसोबत जोडलं जाणं धोक्याचं ठरु शकतं असा दावा तज्ञांनी केला आहे. 
 

Web Title: Becoming Viral on Facebook 'Sarahah', your message can be hidden by identifying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.