फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:41 AM2019-05-04T09:41:45+5:302019-05-04T09:47:34+5:30

फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे.

facebook developer conference 2019 facebook messenger desktop app group viewing and more features on the way | फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

फेसबुक मेसेंजरने करता येणार हॉटेलचं बुकिंग; डेस्कटॉप युजर्सलाही ठरणार फायदेशीर

Next
ठळक मुद्देफेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे.फेसबुकचं मेसेंजर अ‍ॅप हे Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी लाँच करण्यात येणार आहे. फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे.

नवी दिल्ली - फेसबुक आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकच्या अ‍ॅन्युअल डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये अनेक फीचर्ससह फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा फेसबुकने केली आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये अपॉइंटमेंट हे नवं फीचरही लाँच होणार असून याच्या मदतीने हॉटेलचं बुकींग करता येणार आहे. फेसबुकचं मेसेंजर अ‍ॅप हे Windows आणि macOS या दोन्ही प्रणालीसाठी लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रुप मॅसेजिंग, व्हिडिओ चॅटिंग, GIF इमेजेस पाठविण्याची सुविधा युजर्सना मिळणार आहे. सध्या या अ‍ॅप चाचणी सुरू असून या वर्षाच्या शेवटी हे लाँच करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे.

फेसबुक मेसेंजरचं डेस्कटॉप व्हर्जनसोबतच group viewing नावाचं आणखी एक फीचर यात येणार आहे. मित्रांसोबत व्हिडीओ बघण्यासाठी या फीचरचा वापर करता येणार आहे. तसेच हा  व्हिडीओ सुरू असताना तुम्ही संभाषण देखील करू शकाल. कोणता व्हिडिओ प्लॅटफॉर्म या फीचरला सपोर्ट करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावर काम करत असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. 

चॅटिंग करताना तुमच्यात आणखी उत्साह निर्माण करण्यासाठी फेसबुक मॅसेंजरमध्ये एक डेडीकेटेड स्पेस देण्यावर फेसबुक विचार करत आहे. ज्यामध्ये  तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना आवडीनुसार कंटेट मिळवता येणार आहे. तसेच तुम्ही काही लोकांनाच दिसू शकेल असा मॅसेज किंवा स्टोरी तयार करू शकाल. फेसबुक बिजनेससाठी मेसेंजरचा उपयोग आणखी रंजक बनवण्यावर फेसबुक भर देत आहे. फेसबुक मेसेंजरमध्ये लवकरच नव्या स्वरूपात जाहिराती झळकतील ज्याचा उपयोग व्यावसायिकांना उत्तम प्रकारे करून घेता येणार आहे. अपॉइंटमेंट हे नवं फीचरसुद्धा यामध्ये अ‍ॅड होणार आहे. ज्यात कोणत्याही हॉटेल मालकाशी बोलून तुम्हाला हॉटेलचं बुकींग करता येणार आहे.

Facebook अकाऊंटचा पासवर्ड सुरक्षित आहे का?; 'या' सिक्युरिटी टिप्स करतील मदत!


क्रेब्स ऑन सिक्युरिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकने युजर्सचे पासवर्ड प्लेन टेक्स्टच्या स्वरूपात साठवून ठेवले आहेत. ते कंपनीमध्ये काम करणारा एखादा कर्मचारी सहजपणे बाहेर काढू शकतो. त्यामुळे पासवर्डच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान अशा पद्धतीने युजर्सचे पासवर्ड लीक होणे शक्य नसल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. एखाद्या युजरने आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर कंपनीच्या टीमकडून तत्काळ डिलीट केली जाते. 

Facebook वर आता आवडीच्या गाण्यासोबत पोस्ट करता येणार 

गाणी ऐकायला अनेकांना आवडतं. काही वेळा आवडीची गाणी सोशल मीडियावर शेअर करून पोस्ट करण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येक वेळी हे शक्य होतं असं नाही. फेसबुक लवकरच आपल्या युजर्सना अशा पद्धतीची सुविधा देणार आहे. फेसबुक युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. या सुविधेसाठी फेसबुकने काही भारतीय संगीत कंपनीशी करार केला आहे. कंपनीने टी-सीरीज म्यूझिक, झी म्यूझिक आणि यश राज फिल्म्ससह काही कंपनींसह करार केला आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरमुळे युजर्सना आपल्या पोस्ट आणि व्हिडीओसोबत गाणं शेअर करण्याची सुविधा मिळणार आहे.

गेमिंग लव्हर्ससाठी खूशखबर, फेसबुकने लाँच केला Gaming Tab

फेसबुकने यावेळी गेमिंग लव्हर्स युजर्ससाठी एक Gaming Tab लाँच केला आहे. फेसबुकच्या मेन नेविगेशन पेजवर युजर्सना आता एक वेगळं सेक्शन दिसणार आहे. यामुळे युजर्स गेमिंग पेजवर थेट जाऊ शकणार आहेत. गेमिंग पेजवर युजर्सना अनेक इंटरेस्टिंग गेमचे ऑप्शन देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे गेम्स युजर्सना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत खेळता येणार आहेत.  Gaming Tab वर युजर्सना गेम्सचे लोकप्रिय ग्रुप्स फॉलो करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच या नव्या टॅबमध्ये युजर्स आपल्या आवडीने गेम्स निवडून अनेक नवीन कॉन्टॅक्ट शोधू शकतात. रिपोर्टनुसार, युजर्सना या टॅबमध्ये टॉप स्टीमर्स आणि गेम पब्लिशर्सचे व्हिडीओ तसेच इतर गेमिंग गुप्सबाबत अपडेट दिसणार आहेत. सर्व लोकांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी एक वेगळा गेमिंग टॅब लाँच केलं आहे. जगभरात जवळरपास 700 मिलियन म्हणजेच 70 कोटी युजर्स रोज व्हिडीओ गेम खेळतात असा दावा कंपनीने केला आहे. 

facebook asking for new users email password know why | फेसबुक मागत आहे युजर्सकडून ई-मेलचा पासवर्ड,

फेसबुकवरून व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टालाही मॅसेज पाठविता येणार...

गुगलच्या ऑर्कुटसारखी फेसबुकची स्थिती होऊ नये म्हणून फेसबुक कंपनी नवनवीन फीचर आणत असतं. आता फेसबुकवरून इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही मॅसेज पाठविता येणार आहेत. ही सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवरूनही फेसबुकला मॅसेज पाठविण्यासाठी मिळणार आहे. खरंतर फेसबुक त्याच्या मालकीच्या या तिन्ही प्लॅटफॉर्मला एकमेकांना जोडण्याची तयारी करत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार ही कल्पना मार्क झुकरबर्ग यांना सुचली आहे. या तिन्ही प्लॅटफॉर्मच्या अ‍ॅपचा वापर बदलणार नसून केवळ एकमेकांना क्रॉस प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठविता येणार आहेत. 

Web Title: facebook developer conference 2019 facebook messenger desktop app group viewing and more features on the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.