Facebook वर लवकरच येणार Whatsapp सारखं फीचर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:55 PM2019-01-03T13:55:09+5:302019-01-03T14:15:00+5:30
फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे.
नवी दिल्ली - Facebook आणि Whatsapp नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतात. Whatsapp वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या नव्या फीचर पर्यायाला युजर्सची चांगलीच पसंती मिळाली. Whatsapp सारखाच हा पर्याय लवकरच फेसबुकमध्येही दिसणार आहे. फेसबुक लवकरच Facebook Messenger वरून पाठवलेला मेसेज डिलीट करण्याच्या पर्यायाचे फीचर सुरू करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना 'डिलीट फॉर एवरीवन' हा पर्याय मिळणार आहे. सध्या फेसबुकवर या फीचरची चाचणी करण्यात येत आहे.
एका युजरने याचा स्क्रीनशॉट रेडिटवर शेअर केला आहे. यामध्ये मेसेज डिलीट करण्याचे दोन पर्याय दाखवण्यात आले आहेत. मेसेज डिलीट करण्यासाठी 'Remove for everyone' आणि 'Remove for you' अशा दोन पर्यायाचा समावेश फेसबुक करणार आहे. फेसबुकच्या मेसेंजरवरून पाठवलेला मेसेज डिलीट करता येत नाही. Whatsapp वर तासाभरात मेसेज डिलिट करण्याची सुविधा युजर्संना देण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक किंवा चुकून पाठवलेला मेसेज डिलीट करता येतो. त्यामुळेच आता फेसबुकवरील मेसेज डिलीट करता यावेत यासाठी फेसबुकने हे नवीन फीचर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Whatsapp वर सध्या एका तासात मेसेज डिलीट करण्याची सुविधा आहे. परंतु, फेसबुकवर किती वेळ अशी सुविधा देण्यात येणार आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. फेसबुक आपल्या मेसेंजर अॅपमध्ये सातत्याने नवनवीन फीचर्स अॅड करत आहे. अॅन्ड्रॉइड मेसेंजर अॅपमध्ये डार्क मोड फीचरची चाचणी करण्यात येत आहे.