...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 02:37 PM2019-04-15T14:37:07+5:302019-04-15T14:40:21+5:30

व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे.

four things can get your whatsapp account banned during general elections | ...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे.चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर वापरू नका किंवा त्यांना मेसेज करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यास तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. या चार कारणांबाबत जाणून घेऊया.  

व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या 'फ्रीक्वेंटली आस्कड क्वेश्नस' (FAQ) मध्ये काही नियम स्पष्ट नमूद केले आहेत. यामध्ये कोणत्याही युजर्सने बल्क मेसेज, ऑटो डायस मेसेजचा प्रयत्न करता कामा नये. जर तुम्ही एखाद्या युजरला त्याला नको असलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवला आणि त्याने तुमच्या मेसेजला रिपोर्ट केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. अनऑथराइज्ड आणि ऑटोमेटेड मेसेज पाठवणारे अकाऊंट अथवा ग्रुप तयार करू नका. तसेच व्हॉट्सअ‍ॅपचं मॉडिफाइड व्हर्जन वापरू नका. 

WhatsApp चं भन्नाट फीचर; आपल्या मर्जीने ग्रुपमध्ये अ‍ॅड होणार युजर

कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचा नंबर वापरू नका किंवा त्यांना मेसेज करू नका. अनोळखी व्यक्तींचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यास तुमचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ब्लॉक केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांच्या क्रमांकांची यादीची विक्री काही मार्केटिंग संस्थांकडून करण्यात येते. अशा फोन क्रमांकांची यादी बनवून एखाद्याच्या परवानगीशिवाय नंबर वापरल्यास व्हॉट्सअ‍ॅप तुम्हाला ब्लॉक करू शकतं.

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

व्हॉट्सअ‍ॅपचे अनेक युजर्स ब्रॉडकास्ट मेसेज पाठवतात. तुमचा फोन क्रमांक ज्यांना मेसेज पाठवू इच्छिता त्या युजर्सकडे सेव्ह असेल तर त्यांना ब्रॉडकास्ट मेसेज मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही. त्यामुळे अनोळखी लोकांना वारंवार ब्रॉडकास्ट मेसेज तुम्ही पाठवत असाल तर तुमचा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक रिपोर्ट होऊ शकतो. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅप तुमचं अकाऊंट ब्लॉक करू शकतं.

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी नियम व अटी यांच्याशी सहमत असल्याचे मान्य करतात. त्यानंतरच अ‍ॅप वापरण्याचा अ‍ॅक्सेस मिळतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील, द्वेष निर्माण करणारे मेसेज, धमकी देणारे मेसेज पाठवण्यास मनाई आहे. अशाप्रकारे मेसेज पाठवल्यास ते नियमांचे उल्लंघन असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात व्हॉट्सअ‍ॅपकडून कारवाई करण्यात येते. 

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

 

Web Title: four things can get your whatsapp account banned during general elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.