20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला Gionee A1 Lite स्मार्टफोन लॉंच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 07:04 PM2017-08-09T19:04:36+5:302017-08-11T20:25:52+5:30
जिओनी कंपनीने तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीकडून जिओनी A1 Lite या स्मार्टफोनचे बुधवारी लॉंचिग करण्यात आले. उद्यापासून (दि.10) भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे.
नवी दिल्ली, दि. 9 - जिओनी कंपनीने तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला आहे. कंपनीकडून जिओनी A1 Lite या स्मार्टफोनचे बुधवारी लॉंचिग करण्यात आले. उद्यापासून (दि.10) भारतातील सर्व रिटेल स्टोअरमध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी असणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिओनी कंपनीने A1 प्लस हा स्मार्टफोन मार्केटमध्ये आणला होता. या स्मार्टफोनच्या यशानंतर कंपनीने A1 Lite आणला. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. तसेच, 4,000mAh बॅटरी असून याची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. याचबरोबर जिओनी A1 Lite सोबत काही ऑफरसाठी जिओनी कंपनीने एअरटेल आणि पेटीएमसोबत पार्टनरशिप केली आहे. यामध्ये जिओनी A1 Lite खरेदी केल्यानंतर एअरटेल सिमकार्ड असलेल्या ग्राहकाला सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दर महिन्याला 10 जीबी डाटा मिळणार आहेत. तर, पेटीएमच्या माध्यमातून स्मार्टफोन खरेदी केल्यास कॅशबॅक मिळणार आहे.
जिओनी A1 Lite स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबीपर्यंत एक्सपान्डेबल मेमरी देण्यात आली आहे. तसेच, 5.3 इंच एचडी डिस्प्लेसह गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat असून 1.3 गीगाहर्टस असून MediaTek MT6753 प्रोससर आहे. याशिवाय 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी 4 जी, VoLTE, वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यूटुथचा ऑप्शन आहे.
काय आहेत फीचर्स?
- 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
- 3 जीबी रॅम
- 32 जीबी इंटरनल मेमरी
- 256 जीबीपर्यंत एक्सपान्डेबल मेमरी
- ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat
- 4,000mAh बॅटरी
- किंमत 14,999 रुपये.