ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 11:11 AM2019-01-28T11:11:09+5:302019-01-28T11:22:28+5:30

गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे.

gmail latest feature updates mailing gets more easy and exciting with gmail new feature | ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स

ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स

Next
ठळक मुद्देगुगलने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे.Undo आणि Redo सोबतच स्ट्रायकथ्रू हे नवीन बटण अ‍ॅड करण्यात आले आहे. गुगलने EML फॉर्मेटमध्ये मेसेज डाऊनलोड करण्याचा पर्यायही अ‍ॅड केला आहे.

नवी दिल्ली - गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले आहे. गुगलने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे.

Gmail च्या लेटेस्ट अपडेटमध्ये कंपोज विंडोच्या टास्क बारमध्ये Undo आणि Redo या शॉर्टकटचा समावेश करण्यात आला आहे. नवीन फीचर्स हे टास्कबारच्या एकदम सुरुवातीला अ‍ॅड करण्यात आला आहे. फॉन्ट टाईप आणि फॉन्ट साईझ पर्यायाआधी हे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सना आता मेल करताना या गोष्टीचा अत्यंत फायदा होणार आहे.  

Undo आणि Redo सोबतच स्ट्रायकथ्रू हे नवीन बटण अ‍ॅड करण्यात आले आहे. कीबोर्डवरचे शॉर्टकट ज्यांना पसंत नाहीत अशा लोकांना या बटणाचा अधिक उपयोग होणार आहे. Undo आणि Redo प्रमाणेच या बटणाचा देखील मेल करताना फायदा होणार असल्याचं गुगलने म्हटले आहे.  

गुगलने EML फॉर्मेटमध्ये मेसेज डाऊनलोड करण्याचा पर्यायही अ‍ॅड केला आहे. त्यामुळे युजर्सना मल्टीमीडिया फाईल्स ऑफलाईन यूज करण्यासाठी डाऊनलोड करता येणार आहेत. लवकरच हे फीचर सर्व Gmail युजर्ससाठी रोलआउट करण्यात येणार आहे. गुगलने हे फीचर्स GSuite युजर्ससाठी रोलआऊट करायला सुरुवात केली आहे. 

Web Title: gmail latest feature updates mailing gets more easy and exciting with gmail new feature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.