Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 02:27 PM2019-03-14T14:27:22+5:302019-03-14T14:39:32+5:30

जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया. 

google account how to recover your google account or gmail password if you forgot | Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

Gmail अकाऊंटचा पासवर्ड विसरलात?; रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडिया अकाऊंटसह अनेक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. जीमेल वर कामासंबंधी अनेक महत्त्वाचे मेल हे सातत्याने येत असतात. जीमेलचा पासवर्ड एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवा.

नवी दिल्ली - सोशल मीडिया अकाऊंटसह अनेक अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डचा वापर केला जातो. मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पासवर्ड असल्याने काही वेळा ठेवलेला पासवर्ड विसरण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळेच चुकीचा पासवर्ड टाकला जातो. तसेच गुगल अकाउंटवरून लॉगइन करताना अनेकदा लॉगइन होत नसल्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जीमेल वर कामासंबंधी महत्त्वाचे काही मेल हे सातत्याने येत असतात. व्यवहारासंदर्भातील माहिती, फाईल्स, फोटो पाठवण्यासाठी जीमेलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण जीमेलचा पासवर्ड विसरला असाल किंवा तो बदलायचा असेल तर काय करायचं हे जाणून घेऊया. 

पासवर्ड रिकव्हर करण्यासाठी 'या' स्टेप्स करतील मदत

- जीमेल ओपन केल्यानंतर सर्वप्रथम Forgot Password वर क्लिक करा.

- पासवर्ड आठवण्याचा प्रयत्न करा नाहीतर ‘Try another way’ ऑप्शनवर क्लिक करा. 

- जीमेल अकाऊंटशी लिंक असलेल्या स्मार्टफोनवर नोटीफिककेशन पाठवण्याची परवानगी गुगल तुमच्याकडे मागेल. त्यावेळी त्याला OK म्हणा.

- अकाऊंटशी लिंक असलेला नंबर नसेल तर ‘Try another way’ वर क्लिक करा. 

- गुगल तुमच्याशी संबंधित असलेला कोणताही एक ई-मेल आयडी विचारेल. त्यानंतर कन्फर्मेशन करून वेरिफीकेशन कोड पाठवला जाईल. 

- कोड मिळाल्यानंतर तो कोड डायलॉग बॉक्समध्ये टाका.

-  ही संपूर्ण प्रकिया केल्यानंतर तुम्ही तुमच्या जीमेल अकाऊंटचा वापर पुन्हा एकदा करू शकता.

जीमेलचा पासवर्ड बदलण्यासाठी देखील याच स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हवा असलेला पासवर्ड सेट करा. तसेच हॅकिंगचे प्रकार वाढत असल्याने तुमचा पासवर्ड काही काळानंतर बदलत राहा. जीमेलचा पासवर्ड एखाद्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह करून ठेवा. यासाठी क्रोममध्ये पासवर्ड सेव्ह करून ठेवण्याचा पर्याय देखील उत्तम असून त्याचा विचार करू शकता. 

ई-मेल करणं होणार आता अधिकच सोपं, Gmail मध्ये आले 'हे' नवीन फीचर्स

गुगलने गेल्या वर्षी Gmail मध्ये अनेक नवनवीन बदल केले होते. कंपनीने नवीन डिझाईन आणि फीचर्ससह Gmail लाँच केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्षभराने ई-मेल सर्व्हिसमध्ये बदल करण्यात आले. गुगलने Gmail च्या कंपोज विंडोमध्ये Undo आणि Redo च्या शॉर्टकटचा समावेश केला आहे. Gmail च्या लेटेस्ट अपडेटमध्ये कंपोज विंडोच्या टास्क बारमध्ये Undo आणि Redo या शॉर्टकटचा समावेश करण्यात आला आहे. नवीन फीचर्स हे टास्कबारच्या एकदम सुरुवातीला अ‍ॅड करण्यात आला आहे. फॉन्ट टाईप आणि फॉन्ट साईझ पर्यायाआधी हे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्सना आता मेल करताना या गोष्टीचा अत्यंत फायदा होणार आहे.  

Gmail, Google Drive अन् you tubeचा 'टेक्निकल लोच्या', नेटिझन्सना वापरात अडचणी

गुगलच्या सेवा वापरणाऱ्या जगभरातल्या युजर्सना बुधवारी (13 मार्च) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. Gmail, Google Drive अन्  you tube काम करत नसल्याच्या अनेक युजर्सनी तक्रारी केल्या. जीमेलवर साइन इन केल्यानंतरही या समस्यांचा सामना करावा लागला होता. गुगलशी संलग्न असलेल्या अनेक वेबसाइट लोड होण्यास बराच वेळ घेत असल्याचंही युजर्सचं म्हणणं होतं. आम्ही जीमेल हाताळण्यास होत असलेल्या समस्यांची चौकशी करत आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही आपल्याला माहिती देऊ. जीमेल लॉगिन होत असलं तरी वापर असताना एरर येत आहेत. एकदा क्लिक केल्यानंतर बऱ्याच वेळानंतर एखादा मेल ओपन होत आहे. जीमेलच्या सेवेनं प्रभावित झालेले युजर्सना इतरांना मेल पाठवता येत नाहीत. अशा प्रसंगी पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलने दिला होता.

Web Title: google account how to recover your google account or gmail password if you forgot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल