व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 02:49 PM2018-11-05T14:49:21+5:302018-11-05T14:50:11+5:30

तरूणाईपासून अगदी थोरामोठ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी नवनवीन बदल करत असतं. परंतु इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत अजुनही काही फिचर्सची कमतरता व्हॉट्सअॅपमध्ये आहे.

how to create stickers for whatsapp | व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!

व्हॉट्सअॅप स्टिकर्स सापडतच नाहीत का? 'या' टिप्स वापरा आणि आनंद वाटा!

googlenewsNext

तरूणाईपासून अगदी थोरामोठ्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या फेसबुकच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आपल्या यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी नवनवीन बदल करत असतं. परंतु इतर मेसेजिंग अॅपच्या तुलनेत अजुनही काही फिचर्सची कमतरता व्हॉट्सअॅपमध्ये आहे. त्यामुळे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी व्हॉट्स अॅपला आणखी काही फिचर्स आपल्या यूजर्ससाठी देणं गरजेचं आहे. याच गोष्टी लक्षात घेऊन व्हॉट्सअॅपने एक नवीन धमाकेदार फिचर यूजर्ससाठी आणलं असून ज्याची सर्व यूजर्समध्ये चर्चा सुरू आहे.

व्हॉट्सअॅपने आणलेलं हे फिचर म्हणजे व्हॉट्सअॅप स्टिकर्स होय. परंतु अनेक यूजर्सना हे स्टिकर्स कसे वापरायचे किंवा नेमके व्हॉट्सअॅपमध्ये हे फिचर कुठे आहे? हे अनेक यूजर्सना माहीत नाही. गोंधळून जाऊ नका. अगदी सोपं आहे. आम्ही तुम्हाला काही स्टेप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्हीही तुमच्या मित्रमंडळींशी चॅट करताना हे स्टिकर्स वापरू शकता. जाणून घेऊयात व्हॉट्सअॅप स्टिकर्स कसे वापरायचे त्याबाबत...

– व्हॉट्सअॅप स्टिकर्स मिळवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. म्हणजेच तुमचं व्हॉट्सअॅप तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. 
 
- जर तुमच्याकडे अँड्रॉईडसाठी बीटा 2.18.329 आणि अॅपलसाठी 2.18.100 हे व्हर्जन डाऊनलोड करावे लागतील. हे अपडेट केल्यानंतरच तुम्हाला यामध्ये नवीन व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पर्याय उपलब्ध होईल. 

- या फिचरमध्ये यामध्ये नवे स्टिकर मिळण्याबरोबरच स्टिकर स्टोअरही देण्यात आले आहे. याद्वारे हवे असलेले स्टिकर पॅक डाऊनलोड करता येणार आहे. हे स्टिकर पॅक व्हॉट्सअॅप वेबवरही वापरता येणार आहे. 

- अपडेट केल्यानंतर चॅट विंडोमध्ये सर्वात शेवटी असणाऱ्या इमोजीच्या आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर इमोजीची विंडो ओपन होईल. त्यामध्येच सर्वात खाली इमोजी, जीआयएफ असे फिचर्स देण्यात आलेले आहेत, त्यामध्येच सर्वात शेवटचा पर्याय 'व्हॉट्स अॅप स्टिकर्स'चा देण्यात आला आहे. 

- यामध्ये काही स्टिकर्स देण्यात आले आहेत. ते तुम्ही वापरू शकता. पण तुम्हाला आणखी स्टिकर्स पाहिजे असतील तर त्यासाठी स्टिकर पॅक डाउनलोड करावा लागेल. 

- स्टिकर पॅक डाऊनलोड करण्यासाठी All Stickers या टॅबवर जावे लागेल. यानंतर डाऊनलोड बटनावर क्लीक करावे लागेल. My Stickers टॅबमध्ये हे डाऊनलोड केलेले स्टिकर पाहता येतील. आणखी स्टिकर हवे असतील तर Get More Stickers वर क्लीक करावे. 

- तुम्ही स्मार्टफोनमध्ये हे फिचर अपडेट केलेलं असेल तरच ते तुम्ही व्हॉट्सअॅप वेबवर वापरू शकता. व्हॉट्सअॅप वेबवर स्टिकर दिसत नसतील तर ब्राऊजरचा कॅचे डिलीट करावा आणि वेबपेज पुन्हा रिलोड करावे लागेल.

चॅट मध्ये स्टिकर्सचा वापर करत असाल तर खालील स्टेप्स फॉलो करा :

- चॅट बारमध्ये दिसणाऱ्या इमोजी बटनावर क्लीक करावे लागेल. 

- यानंतर स्टिकरचा आयकॉन दिसेल. 

- याशिवाय हिस्ट्री टॅबही दिसेल. 

- याठिकाणी पूर्वी वापरलेले इमोजी दिसतील. 

- जर तुम्हाला एखादं स्टिकर फेव्हरेट टॅबमध्ये ठेवायचं असेल तर त्यासाठी स्टिकर निवडल्यावर स्टार आयकॉनवर क्लीक करावे लागणार आहे. 

कसे कराल बीटा इन्स्टॉल?

स्टिकर पॅक वापरण्यासाठी गुगल प्ले बीटा प्रोग्रॅम किंवा एपीके मिरर साईटमवरून एपीके फाईल डाऊनलोड करावे लागणार आहे. 
 

Web Title: how to create stickers for whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.