स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:20 PM2019-05-16T12:20:36+5:302019-05-16T12:33:39+5:30

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे.

how to save whatsapp status without capturing screenshots | स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस

googlenewsNext

नवी दिल्ली - इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे. या फीचरच्या मदतीने एखाद्या लिंकपासून ते व्हिडीओ, मीम्स, फोटो, हॉलीडे डेस्टीनेशनसारख्या सर्व गोष्टी शेअर करता येतात. यातील अनेक स्टेटस हे हवे असल्याने ते सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्क्रीनशॉट काढला जातो. मेसेजिंग अ‍ॅपमध्ये स्टेटस सेव्ह करण्याचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र हे स्टेटस सेव्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्याबाबत जाणून घेऊया.

 स्टेटस सेव्हर फॉर व्हॉट्सअ‍ॅप

- गुगल प्ले स्टोरवरून सर्वप्रथम सेव्हर अ‍ॅप डाऊनलोड करा.

- व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटस पेजवर जाऊन यूजरनेमवर टॅप करा.

- फोनमधील स्टेटस सेव्हर ओपन करा. हे अ‍ॅप स्टेटसचा डिस्प्ले स्कॅन करेल.

- यानंतर व्हिडीओ आणि फोटोंचा एक पर्याय दिसेल. त्यापैकी तुम्हाला हवा असलेला पर्याय निवडा.

- अ‍ॅपमध्ये स्टेटसच्या बाजूला युजर्सना डाऊनलोडचा पर्याय दिसेल.

- डाऊनलोड पर्यायावर क्लिक केल्यास स्टेटस तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह होईल.

थर्ड पार्टी अ‍ॅपशिवाय असं करा स्टेटस डाऊनलोड

युजर्स जे काही स्टेटस पाहतात ते सर्व स्टेटस हे व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड करत असतं. मात्र हे फार कमी लोकांना माहीत आहे. त्यामुळेच स्टेटस सेव्ह करण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची गरज नाही. यासाठी युजर्सना स्मार्टफोनमधील फाईल मॅनेजरमध्ये जाणं गरजेचं असणार आहे.

- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये फाईल मॅनेजर ओपन करा. 

- फोनच्या इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन सेटींग्सवर क्लिक करा.

- शो हिडन फाईल्सचा पर्याय दिसेल. तो पर्याय इनेबल करा. 

- इंटरनल स्टोरेजमध्ये व्हॉट्सअ‍ॅप फोल्डरमध्ये जा. तेथील मीडिया पर्यायावर क्लिक करा.

- फोल्डरमध्ये 'Statuses' चा एक पर्याय मिळेल. त्यावर क्लिक केल्यास तिथे युजर्सना सर्व व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस मिळतील. 

सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव

व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. त्वरीत व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा कारण व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक बग सापडला आहे. Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो. म्हणजेच स्मार्टफोनवर येणारा एखादा कॉल देखील धोकादायक ठरणार आहे. मग तो कॉल युजर्सने केला असेल अथवा युजर्सने तो रिसीव्ह केला असेल तरी त्याचा फटका बसणार आहे. फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात. 

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स 

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे.  ‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यानंतर अ‍ॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WhatsApp स्टेटसमुळे त्रस्त असाल तर 'ही' ट्रिक करेल मदत

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक जण आपली स्टोरी ही स्टेटसवर शेअर करत असतात. मात्र काही वेळेस त्याचा कंटाळा येतो. मात्र या स्टेटसपासून युजर्सना त्यांची सुटका करता येते. व्हॉट्सअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांचे स्टेटस दिसत असते. जर युजर्सना ते स्टेटस कायमचं डिलीट करायचं असेल तर सर्वप्रथम फोनचं इंटरनेट बंद करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप बंद करून स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा. तिथे व्हॉट्सअ‍ॅपला फोर्स स्टॉप करा. यानंतर ही काही वेळ ऑफलाईन राहा म्हणजेच फोनचं इंटरनेट बंद ठेवा. त्यानंतर फोनच्या टाईम सेटींगमध्ये जाऊन तेथे असलेल्या वेळेपेक्षा 24 तास पुढे असलेली वेळ देऊन वेळ बदला. फोनची वेळ बदलल्यानंतर टाईम सेटींग बंद करा. त्यानंतर बंद केलेले फोनचे इंटरनेट सुरू करा. तसेच व्हॉट्सअ‍ॅप सुरू करा. त्यानंतर कोणाचेही स्टेटस दिसणार नाही. 

 

Web Title: how to save whatsapp status without capturing screenshots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.