आता इन्स्टाग्रामवर सुद्धा करा शॉपिंग, नवीन फीचर लाँच!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 05:46 PM2019-03-20T17:46:16+5:302019-03-20T17:50:46+5:30
सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इंस्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे.
सॅन फ्रांसिस्को : सोशल मीडियात लोकप्रिय असणारे इंस्टग्राम आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी इन्स्टाग्रामवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे. अमेरिकेत मंगळवारी प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम फेसबुकचीच एक कंपनी आहे. या कंपनीने एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'आम्ही इन्स्टाग्रामवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत. जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर इन्स्टाग्राम अॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.' याचबरोबर, इन्स्टाग्राम अॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे. यामधून ग्राहक आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
“It’s a retail revolution.” 🤩@TODAYshow 🤩 https://t.co/UULB1NJp0u
— Instagram (@instagram) March 19, 2019
दरम्यान, आजच्या इंटरनेटच्या जगात खूप काही बदलले आहे. ई-कॉमर्स कंपन्यामुळे सगळ्या गोष्टी घर बसल्या हातात मिळू लागल्या आहेत. त्यात ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ईबे, फ्लिपकार्ट, अॅमेझोन यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या नेटिझन्समध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.
Today, we're introducing checkout on Instagram. When you find a product you love, you can now buy it without leaving the app. 🛍💕https://t.co/o1L5WsfgVEpic.twitter.com/IlVJxOr10x
— Instagram (@instagram) March 19, 2019