इन्स्टाग्रामने आणलं नवं फीचर, अश्लील फोटो ब्लर ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 11:23 AM2019-02-08T11:23:02+5:302019-02-08T11:30:04+5:30
इन्स्टाग्रामने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत.
नवी दिल्ली - सोशल मीडियावर फोटोंच्या दुनियेतून वर्चस्व गाजवणारं इन्स्टाग्राम आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. इन्स्टाग्रामने आता आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणले आहे. सेन्सिटिव्ह स्क्रीन असं या नव्या फीचरचं नाव असून इन्स्टाने हे फीचर लॉन्च केले आहे. या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडीओ, थंबनेल्स युजर्सने क्लिक करेपर्यंत ब्लर दिसणार आहेत.
वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचललं आहे. अल्पवयीन मुला-मुलींना नुकसान पोहचू नये यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी यासंबंधीची घोषणा केली. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.
इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी सोशल मीडियावर तरुण वर्ग खूप मोठा असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी हव्या त्या उपाययोजना कराव्यात असा आदेश कंपन्यांना दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्राममध्ये हा बदल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामने याआधी काही दिवसांपूर्वी आपल्या युजर्ससाठी एक भन्नाट फीचर आणले होते. या फीचरच्या मदतीने युजर्स एकाच वेळी मल्टिपल अकाऊंट्सवरून पोस्ट करणे शक्य होणार आहे. इन्स्टाग्रामवर युजर्सना याआधी वेगवेगळ्या अकाऊंटवरून पोस्ट शेअर करायची असल्यास थर्ड पर्टी अॅपची मदत घ्यावी लागत होती किंवा मग एका एका अकाऊंटवर जाऊन पोस्ट शेअर करावी लागत असे. मात्र नव्या फीचरमुळे मल्टिपल अकाऊंट एकाच वेळी मॅनेज करणं अधिक सोपं होणार आहे.