ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल
By शेखर पाटील | Published: September 14, 2017 08:00 AM2017-09-14T08:00:00+5:302017-09-14T08:00:00+5:30
ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
ओप्पो कंपनीने आपला ए ७१ हा स्मार्टफोन १२,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे.
ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित कलर ३.१ ओएसवर चालणारा आहे. गोल्ड आणि ब्लॅक या रंगांमध्ये सादर करण्यात आलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टने या मॉडेलला खरेदी करणार्यांसाठी काही खास ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात प्रामुख्याने सुलभ हप्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रिलायन्स जिओने ओप्पो ए ७१च्या खरेदीदाराला ३९९ रूपयात तीन महिन्यांपर्यंत मोफत कॉलिंगसह ६० जीबी अतिरिक्त डाटा देण्याचे जाहीर केले आहे.
ओप्पो ए ७१ या मॉडेलमध्ये मेटलची युनिबॉडी प्रदान करण्यात आली आहे. यात ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. मीडियाटेकचा ऑक्टा-कोअर एमटी६७५० टी हा प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. याची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ३,००० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरीने सज्ज असेल.
ओप्पो ए ७१ हा स्मार्टफोन १३ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्याने युक्त आहे. यात एफ/२.२ अपार्चर, पीडीएएफ, एलईडी फ्लॅश आदी फिचर्स असतील. तर यातील फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा असून यात एफ/२.४ अपार्चर देण्यात आले आहे. यात ड्युअल सीमकार्डचा सपोर्ट असेल. तसेच यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट, ई-कंपास आदी सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.