WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 10:27 AM2019-04-16T10:27:54+5:302019-04-16T10:41:39+5:30

इंन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक खास फीचर आणलं आहे.

whatsapp android beta gets new feature ignore archived chats know how it works | WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक खास फीचर आणलं आहे. Vacation Mode हे फीचर आता 'Ignore archived chats' या नव्या नावाने आले आहे. Ignore archived chats फीचरच्या मदतीने युजर्स जे नोटिफिकेशन नको आहेत ते बंद करू शकतात.

नवी दिल्ली - इंन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी आणखी एक खास फीचर आणलं आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये Vacation Mode या नव्या फीचरची चाचणी सुरू होती. आता हे फीचर बीटा व्हर्जनवर देण्यात आले आहे. 

WABetaInfo च्या ट्वीटनुसार, कंपनी एका नव्या नावाने हे फीचर युजर्ससाठी आणत आहे. बीटा 2.19.101 व्हर्जनमध्ये युजर्स याचा वापर करू शकतात. याआधी Vacation Mode या नावाने व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरची चाचणी सुरू होती. तुम्ही जेव्हा सुट्टीवर किंवा फिरायला जाता तेव्हा Vacation Mode फीचरचा वापर करू शकता. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या रिंगटोनपासून दूर राहू शकता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सुट्ट्यांमध्ये तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. या फीचर्सच्या माध्यमातून कन्व्हर्सेशन म्यूट करू शकता. पुन्हा जेव्हा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप हातात घ्याल, तेव्हा नवे मेसेज मिळतील. Vacation Mode हे फीचर आता 'Ignore archived chats' या नव्या नावाने आले आहे. 


व्हॉट्सअ‍ॅपवर या नव्या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम सेटींगमध्ये जा. नोटिफिकेशनचा एक पर्याय मिळेल. त्यानंतर Ignore archived chats अ‍ॅक्टिव्ह करावं लागेल. Ignore archived chats फीचरच्या मदतीने युजर्स जे नोटिफिकेशन नको आहेत ते बंद करू शकतात. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. ज्या युजर्सनी लेटेस्ट बीटा अपडेट डाऊनलोड केलं आहे त्यांना हे फीचर दिसणार नाही. Vacation Mode हा फीचरपेक्षा 'Ignore archived chats' हे फीचर थोडे वेगळे आहे. म्यूट असेल तेव्हाच Vacation Mode हे आर्काइव्ह चॅट अनआर्काइव्ह होण्यापासून वाचवतं. तर 'Ignore archived chats' हे म्यूट आणि नॉन म्यूट या दोन्ही चॅट्सना अनआर्काइव्ह होण्यापासून वाचवतं. 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

 

Web Title: whatsapp android beta gets new feature ignore archived chats know how it works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.