WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 03:58 PM2019-03-04T15:58:39+5:302019-03-04T16:09:56+5:30

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

whatsapp latest 5 chatting features to be soon in its app updates | WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप आता दहा वर्षांचे झाले आहे. या अ‍ॅपमध्ये गेल्या दहा वर्षांत अनेक बदल झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या अशाच काही दमदार फीचर्सबाबत जाणून घेऊया. 

WhatsApp Group Invitation


व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. WhatsApp आयफोन युजर्स Settings > Account > Privacy > Groups मध्ये हे फीचर असणार आहे. त्यानंतर Everyone, My contact, Nobody हे तीन पर्याय मिळतील. तुम्हाला हवा असलेला पर्याय तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर WhatsApp युजर्स कोणत्याही ग्रुपमध्ये सामील होण्याआधी त्याचं इन्विटेशन पाठवणार आहे. त्यानंतर युजर्स ते इन्विटेशन स्विकारायचं की नाही याबाबत विचार करू शकतात. त्या 'ग्रुप इन्विटेशन' चा विचार करण्यासाठी युजर्सकडे 72 तास असणार आहेत. 

Dark Mode फीचर


WhatsApp अनेक दिवसांपासून Dark Mode या खास फीचरवर काम करत आहे. 2019 मध्ये हे फीचर येणार आहे. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून WhatsApp लवकरच डार्क मोड फीचर आणणार आहे. हे फीचर ऑन केल्यावर WhatsApp वर बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात. सध्या Dark Mode फीचरची चाचणी घेण्यात येत आहे. 

Vacation Mode


तुम्ही जेव्हा सुट्टीवर किंवा फिरायला जाता तेव्हा WhatsApp वर Vacation Mode फीचरचा वापर करू शकता. या फीचर्सच्या माध्यमातून तुम्ही WhatsApp च्या रिंगटोनपासून दूर राहू शकता. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना सुट्ट्यांमध्ये तुम्ही या फीचरचा वापर करू शकता. सध्या तरी हे फीचरची चाचणी सुरू आहे. तुम्ही या फीचर्सच्या माध्यमातून कन्वर्सेशन म्युट करू शकता. पुन्हा जेव्हा तुम्ही WhatsApp हातात घ्याल, तेव्हा नवे मेसेज मिळतील. 

Fingerprint lock for chats


WhatsApp लवकरच युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन एक जबरदस्त फीचर आणणार आहे. फिंगरप्रिंटच्या मदतीने आता WhatsApp ओपन करता येणार आहे. finger Print हे WhatsApp चं नवं फीचर Android आणि IOS या दोन्ही व्हर्जनवर हे लवकरच येणार आहे. या फीचरमुळे दुसरी कोणतीही व्यक्ती तुमचं WhatsApp ओपन करू शकणार नाही. फिंगरप्रिंट फीचरसाठी WhatsApp आपल्या App मध्ये एक नवे सेक्शन सुरू करणार आहे. ज्यामध्ये युजर्सला फिंगरप्रिंट फीचर वापरण्याचा पर्याय देण्यात येईल. भविष्यात हे फीचर IOS अपडेट मध्येही उपलब्ध होणार असून या नव्या फीचरमुळे युजर्सची प्रायव्हसी अधिकच सुरक्षित होईल.

Audio message Redesign


WhatsApp आपल्या कॉन्टॅक्टना ऑडिओ क्लिप पाठवण्याची पद्धत बदलण्यावर काम करत आहे. यामध्ये ऑडिओ क्लिपचा ऑडिओ प्रिव्ह्यू आणि इमेज प्रिव्ह्यू दिसणार आहे. तसेच एकाचवेळी 30 ऑडिओ क्लिप पाठवता येणे शक्य होणार आहे. WhatsApp वर लवकरच हे फीचर येणार आहे. एकाचवेळी 30 क्लिप निवडण्याचे चिन्हंही दिसत आहे. आयओएसवर हे फीचर उपलब्ध करणार आहे. ‘WABetaInfo’ ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून WhatsApp वर होणाऱ्या या नव्या बदलाबाबत माहिती दिली आहे. WhatsApp च्या Android App (व्हर्जन 2.19.1) बीटा व्हर्जनवर हे नवीन फीचर मिळणार आहे.

2019 या वर्षात  PiP मोड, Dark Mode फीचर, Private Reply फीचर, क्यूआर कोड स्कॅन कॉन्टॅक्ट फीचर, कॉन्टॅक्ट रँकींग फीचर, मल्टीपल व्हॉईस मेसेज फीचर येणार आहेत.

Web Title: whatsapp latest 5 chatting features to be soon in its app updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.