सावधान! WhatsApp Bug मुळे जुने मेसेज गायब; असा करा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 12:46 PM2019-01-15T12:46:24+5:302019-01-15T13:21:18+5:30
जुने चॅट अचानक गायब होत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. WhatsApp वर आलेल्या एका Bug मुळे असं झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नवी दिल्ली - WhatsApp हे अत्यंत लोकप्रिय मेसेजिंग अॅप असल्याने मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातो. मात्र आता WhatsApp वर एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. जुने चॅट अचानक गायब होत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी केली आहे. WhatsApp वर आलेल्या एका Bug मुळे असं झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जगभरातील अनेक युजर्सना चॅट अचानक गायब झाल्याचा अनुभव आल्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर याबाबत तक्रार केली आहे. WhatsApp कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
WhatsApp च्या एका युजरने 'गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चॅट हिस्ट्री आपोआप डिलीट होत आहे. मी Moto G4 Plus या स्मार्टफोनचा वापर करत असून दररोज एक-दोन चॅट डिलीट झालेले असतात. गुगलवर यासंबंधी सर्च केलं असता अनेक युजर्सला या समस्येचा सामना करावा लागला असल्याचं समजलं. मी WhatsApp च्या सपोर्ट टीमला 25 पेक्षा अधिक वेळा मेल केला आहे. मात्र अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही' असं म्हटलं आहे.
It looks this issue persists for some Android users.
— WABetaInfo (@WABetaInfo) January 10, 2019
Are you still experiencing it? pic.twitter.com/piBXEUopIt
असं वाचवा तुमचं WhatsApp चॅट
चॅट अचानक गायब होण्यामागचं खरं कारणं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र यापासून वाचण्यासाठी WhatsApp चॅटचा बॅकअप ठेवा. जर तुम्ही आतापर्यंत गुगल ड्राइव्हवर चॅटचा बॅकअप घेतला नसेल तर अशा प्रकारे घ्या.
- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.
- मेन्यूमधील सेटींग या पर्यायावर जा. त्यामध्ये Chats मधील Chat backup या पर्यायावर क्लिक करा.
- Back up to Google Drive असा पर्याय दिसेल.
- या पर्यायावर क्लिक केल्यानंतर बॅकअप Daily, Weekly किंवा Monthly जसा हवा असेल त्यानुसार क्लिक करा.
- WhatsApp वर अशा प्रकारे संपूर्ण चॅटचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर पाठवला जातो.