WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 12:49 PM2019-05-02T12:49:57+5:302019-05-02T12:53:10+5:30

व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

whatsapp removes dark mode feature from its beta app | WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

WhatsApp युजर्ससाठी Bad News; आता 'हे' खास फीचर मिळणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप नेहमीच युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या डार्क मोड फीचरसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.  अ‍ॅन्ड्रॉईडच्या व्हॉट्सअ‍ॅप बीटावरून हे फीचर पूर्णत: हटवण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप अनेक दिवसांपासून Dark Mode या खास फीचरवर काम करत होतं. बीटा टेस्टींगनंतर लवकरच याचं स्टेबल व्हर्जन लाँच केलं जाईल असं म्हटलं जात होतं. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार, युजर्सना व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या डार्क मोड फीचरसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

WABetaInfo च्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅन्ड्रॉईडच्या व्हॉट्सअ‍ॅप बीटावरून हे फीचर पूर्णत: हटवण्यात आलं आहे. या फीचरची युजर्स अनेक दिवसांपासून वाट पाहात असल्याने त्यांच्यासाठी हा एक झटका असल्याचं म्हटलं जात आहे. 2019 मध्ये हे फीचर येणार असल्याची माहिती मिळत होती. रात्रीच्यावेळी काळोखात चॅटींग केल्यास डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यावर उपाय म्हणून WhatsApp लवकरच डार्क मोड फीचर लाँच करण्यात येणार होते. हे फीचर ऑन केल्यावर WhatsApp वर बॅकग्राऊंड कलर काळा होणार आहे. त्यामुळे अधिक वेळ युजर्स चॅट करू शकतात. 


IPL सीझनसाठी Whatsapp चा स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक, असा करा डाऊनलोड

 गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅन्डॉईड आणि आयओएस अ‍ॅपवर स्टीकर फीचर आणलं होतं. त्यामध्ये नवनवीन पॅक येत असतात. आता व्हॉट्सअ‍ॅपने स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक आणला आहे. क्रिकेट प्रेमी लगेचच हा पॅक डाऊनलोड करू शकतात. सध्या हा स्टीकर पॅक व्हॉट्सअ‍ॅपमध्ये दिसत नाही तर तो अ‍ॅड करावा लागतो. स्पेशल क्रिकेट स्टीकर पॅक एकदा डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने इमोजीप्रमाणे त्याचा वापर करता येतो. स्टीकर्सचा वापर हा मोठ्या प्रमाणात युजर्सकडून केला जातो. 

WhatsApp चं नवं अपडेट, 'या' फीचरच्या जागेत झाला बदल

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp हे आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp ने पुन्हा एकदा आपल्या युजर्ससाठी एक खास बदल केला आहे. WABetaInfo ने याबाबतची माहिती दिली आहे. WhatsApp ने अपडेट केल्यानंतर एका फीचरच्या जागेत बदल केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.101 अपडेटमध्ये 'अर्काइव्ड चॅट्स' या फीचरला मेन साइड मेन्यूमध्ये जागा देण्यात आली आहे. सध्या हा पर्याय चॅटमध्ये सर्वात खाली दिसत आहे. मात्र व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्य़ा अपडेटनंतर Archived Chats मेन मेन्यूमध्ये दिसणार आहे. 

WhatsApp वरचे जुने Emojis गायब होणार; 'हे' आहे कारण  

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नव्या डूडल फीचरमध्ये काही विशेष बदल करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप अपडेट झाल्यानंतर डूडल फीचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर इमोजीच्या माध्यमातून चॅटींगची गंमत आणखी वाढत असते. तसेच मेसेज टाईप करण्यापेक्षा इमोजीच्या माध्यमातून संवाद साधणं अनेकांना जास्त सोयीचं वाचत असतं. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज स्टीकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात. व्हॉट्सअ‍ॅप मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

Web Title: whatsapp removes dark mode feature from its beta app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.