1 जुलैपासून 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 11:56 AM2019-06-28T11:56:42+5:302019-06-28T12:01:34+5:30
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक बॅड न्यूज आहे. 1 जुलैपासून काही स्मार्टफोनवरील व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड एफएक्यूनुसार, इंस्टंट मेसेजिंग अॅप फेब्रुवारी 2020 नंतर Android आणि iPhone मध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. ब्लॉगमध्ये अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आहे.
1 जुलै 2019 पासून Windows Store मधून व्हॉट्सअॅप हटवले जाणार आहे. स्टॅटकाऊंटरच्या रिपोर्टनुसार जगभरात फक्त 0.24 टक्के लोक विंडो ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करत आहेत. तसेच 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज फोनमधून व्हॉट्सअॅप बंद केलं जाणार आहे. कंपनीने आपलं सपोर्ट पेज FAQ वर Android व्हर्जन 2.3.7 आणि त्याआधी ऑपरेटींग सिस्टमवर काम करणार नसल्याचं सांगितलं आहे. 1 फेब्रुवारी 2020 नंतर iOS 7 आणि ऑपरेटिंग सिस्टम (OS) वर असलेल्या आयफोन (iPhone) व्हॉट्सअॅप चालणार नाही.
कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये जे युजर्स या ऑपरेटींग सिस्टमचा वापर करत आहेत ते देण्यात आलेल्या तारखेनंतर व्हॉट्सअॅपचा वापर करू शकत नाहीत. तसेच व्हॉट्सअॅपवर नवीन अकाऊंट अथवा व्हेरिफिकेशनसारखी अॅक्टीव्हिटी करू शकत नाहीत. जे युजर्स सहा वर्षापेक्षा अधिक जुना असेलल्या स्मार्टफोनचा वापर करत आहेत त्यांच्यासाठीच व्हॉट्सअॅपने केलेली ही घोषणा बॅड न्यूज आहे.
WhatsApp वर आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय? असं तपासा
व्हॉट्सअॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपवर काही कारणास्तव आपण आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना ब्लॉक करू शकतो. त्या व्यक्तींना ब्लॉक केल्यावर मेसेज पाठवला अथवा रिसीव्ह केला जात नाही. तसेच चॅट म्हणजेच संवाद साधता येत नाही. एखाद्या व्यक्तीशी वाद झाला की लगेचच व्हॉट्सअॅपवर त्या व्यक्तीला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला जातो. जोपर्यंत आपण अनब्लॉक करत नाही तोपर्यंत फोटो, व्हिडीओ, मेसेज पाठवता येत नाही. कधी कधी आपण एखादया व्यक्तीला मेसेज करतो पण तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचला आहे की नाही हे समजतच नाही. म्हणजेच त्या व्यक्तीने ब्लॉक केल्याची दाट शक्यता असते. आपल्याला कोणी ब्लॉक केलं आहे का? किंवा आवडत्या व्यक्तीने ब्लॉक केलंय का? हे तपासण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.
WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स
आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार
WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण
व्हॉट्सअॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. कारण व्हॉट्सअॅप लवकरच सेव्ह आणि अनसेव्ह कॉन्टॅक्टचं प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अल्बम ले-आऊट आणि ऑडिओ फॉरमॅटमध्ये बदल करणारं फीचर आणणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये प्रोफाईल फोटो सेव्ह करण्याची सोय होती. मात्र आता युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर काढण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. पण युजर्सना व्हॉट्सअॅपवर असलेल्या अनेक ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणार आहेत.
जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद
स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस
फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. मात्र हे फोटो स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये ऑटो सेव्ह होतात. आपोआप सेव्ह झालेल्या गोष्टींमुळे फोनची मेमरी लवकर भरते. तसेच युजर्सना ही नको असलेले फोटो डिलीट करावे लागतात. व्हॉट्सअॅपवर आपोआप सेव्ह होणारे हे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा युजर्सना नको असतात. मात्र या समस्येने ग्रस्त असलेल्या युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक सेटींग बदलून या समस्येपासून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे आपोआप फोटो अथवा व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत. अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये सेटींग बदलून असे करता येणार आहे.