बिग बॉस स्पर्धक करिश्मा तन्नावर फसवणुकीचा आरोप, वाचा नेमके काय आहे प्रकरण?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:34 AM2018-03-16T11:34:37+5:302018-03-16T17:04:37+5:30
मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने एकता कपूरच्या ‘नागिन-३’ वरून चांगलीच प्रसिद्धी मिळविली. करिश्मा तन्ना या अगोदर बिग बॉसच्या ...
म डेल आणि टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने एकता कपूरच्या ‘नागिन-३’ वरून चांगलीच प्रसिद्धी मिळविली. करिश्मा तन्ना या अगोदर बिग बॉसच्या सीजन-८ मध्ये बघावयास मिळाली आहे. ती सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असून, नियमितपणे आपल्या चाहत्यांसाठी फोटो शेअर करीत असते. त्यामध्ये आपल्या बोल्ड फोटोंमुळे करिश्मा नेहमीच चर्चेत राहत असते. मात्र आता करिश्मा भलत्याच कारणाने चर्चेत आली आहे. मिड डेनी दिलेल्या माहितीनुसार, करिश्मावर एका इव्हेंट मॅनेजरने फसवणुकीचा आरोप केला आहे. रिपोर्ट्सनुसार, मानस कात्याल नावाच्या इव्हेंट मॅनेजरने करिश्माला एका नोटीस बजावली. ज्यामध्ये तिच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर करिश्माने त्याला ब्लॅकमेल करण्याची धमकीही दिल्याचे समोर येत आहे.
मात्र ३४ वर्षीय करिश्मा तन्नाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मिड डेशी बोलताना करिश्माने म्हटले की, मॅनेरजने माझी फसवणूक केली आहे. मला मुरादाबादला शो असल्याचे सांगितले, जेव्हा मी त्याठिकाणी पोहोचले तेव्हा सांगण्यात आले की, शो हल्द्वानी येथे आहे. हे ठिकाण मुरादाबाद येथून खूपच दूर आहे. त्यावेळी मी मानसला सांगितले की, मी एवढ्या लांब प्रवास करू शकणार नाही. तर मानस कात्यालच्या मते, करिश्मा खोटं बोलत आहे. कारण तिला सुरुवातीला सांगण्यात आले होते की, शो हल्द्वानी येथेच होणार आहे. करिश्माने आमच्या ड्रायव्हरला धमकावताना म्हटले की, जर कार दिल्लीच्या दिशेने नेली नाही तर मी तुझ्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करेल.
इव्हेंट मॅनेजरने पुढे सांगितले की, करिश्माला एडव्हॉन्समध्ये पैसे दिले होते. अशातही ती शोमध्ये पोहोचली नसल्याने माझे जवळपास दहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आता आमची मागणी आहे की, करिश्माने आमची नुकसान भरपाई द्यावी. परंतु करिश्माने पैसे परत देण्यास नकार देताना मी पैसे परत का देऊ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. उलट त्यांनीच माझा मानसिक छळ केल्याबद्दल मला भरपाई द्यायला हवी. आता माझे वकील मानस कात्यालला नोटीस पाठविणार आहेत.
करिश्मा तन्नाने छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून डेब्यू केला होता. त्यानंतर तिने बºयाचशा मालिकांमध्ये काम केले. त्यामध्ये ‘चांद, विरासत आणि नागार्जुन एक यौद्धा’ या मालिकांचा समावेश आहे.