बिग बॉस मराठी २: अभिजीत बिचुकलेंच्या अटकेमुळे ही अभिनेत्री झाली खूश, दिली ही रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:16 PM2019-06-21T19:16:19+5:302019-06-21T19:16:51+5:30
बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसच्या सीझन २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेले स्पर्धेक अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले आहेत. त्यांना सातारा पोलिसांनी आरे पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आलीय. या अटकेनंतर सगळीकडून संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा घाडे हिने नुकतीच प्रतिक्रिया दिलीय. तिने बिचुकले यांना झालेल्या अटकेवर आनंद व्यक्त केलाय.
टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसचा दुसरा सीझन पाहते आहे.
तिने बिग बॉसच्या घरात अभिजीतने अभिनेत्री रुपाली भोसलेबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संताप व्यक्त केला आणि आता बिचुकले यांच्या अटकेवर प्रतिक्रिया देताना म्हणाली की, अभिजीत बिचुकले या माणसाला अटक झाली असेल मला त्याचा आनंद आहे. गेल्या काही दिवसांपासून मी कार्यक्रम पाहते आहे, तेव्हा पासून माझे रक्त खवळते आहे. महिलांशी ज्या पद्धतीने वागतो आहे. विशेषतः रुपालीबाबत जो वागला ते अत्यंत असभ्य आणि लाज वाटणार आहे. असा माणूस त्या घरात असणे त्या घरासाठी कलंक आहे. त्या घराची शान घालवतोय हा माणूस... तो स्वतःला फार मोठा नेता समजतो. हा स्वघोषित नेता आहे. हा आतापर्यंत एकही निवडणूक तो जिंकलेला नाही. चार टवाळ पोरांना एकत्र घेऊन भटकणे आणि स्वतःला नेता समजणे. जो म्हणतो माझ्या घरात ३०० नोकर आहेत. माध्यमांनी तेथे जाऊन पाहावे की खरंच याच्या घरी ३०० नोकर आहेत का? लोकांची घरे बळकावून राहणारा हा फ्रॉड माणूस आहे.
एका न्युज चॅनेलशी बोलताना मेघा म्हणाली की, अशा माणसाला चपलेने हाणलं पाहिजे. मी जर खरंच बिग बॉसच्या घरात गेली तर त्याचे काय करेल मला सांगता येत नाही, हा ज्या पद्धतीने रुपालीशी आणि घरातील व्यक्तींशी वागला आहे. त्यामुळे याला अटक झाली असेल तर ते योग्यच झाले आहे. कारण हीच त्याची जागा आहे. त्याने तिथेच राहावं, हा माणूस बिग बॉसच्या घरात राहण्याच्या लायकीचा नाही आहे. हा मला एक मनोरुग्ण वाटतो. मी खूप संतापाने बोलते आहे, पण हे बोलण्यामागे माझ्या ज्या भावना आहेत, या कदाचित समस्त स्त्री वर्गाच्या असतील.