या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी... पण मिळाला होता नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:45 PM2018-07-23T15:45:58+5:302018-07-23T15:48:54+5:30

सलमानला बॉलिवूडमधील एक अभिनेत्री खूप आवडत होती. तिच्यासोबत लग्न करण्याची सलमानची इच्छा देखील होती आणि त्यामुळे सलमानने तिच्या घरी जाऊन तिच्या वडिलांकडे तिचा हात देखील मागितला होता. पण या अभिनेत्रीच्या वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी चक्क नकार दिला होता.

Salman Khan really wanted to marry Juhi Chawla at one time | या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी... पण मिळाला होता नकार

या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी... पण मिळाला होता नकार

googlenewsNext

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली आहे. सलमानला त्याच्या मुलाखतीमध्ये नेहमीच हा प्रश्न विचारला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमानला बॉलिवूडमधील एक अभिनेत्री खूप आवडत होती. तिच्यासोबत लग्न करण्याची सलमानची इच्छा देखील होती आणि त्यामुळे सलमानने तिच्या घरी जाऊन तिच्या वडिलांकडे तिचा हात देखील मागितला होता. पण या अभिनेत्रीच्या वडिलांनी त्यांच्या लग्नासाठी चक्क नकार दिला होता. ही अभिनेत्री कोण आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
सलमान खान गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत आहे. पण दिवाना मस्ताना हा चित्रपट वगळता त्याने कधीच जुही चावला सोबत काम केलेले नाही. दिवाना मस्ताना या चित्रपटातदेखील सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत होता. सलमानची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर नुकतीच व्हायरल झाली आहे. या मुलाखतीमध्ये सलमान जुहीविषयी बोलताना आपल्याला दिसत आहे. तो सांगतो, ती खूप गोड मुलगी आहे. तिच्यासोबत मला लग्न करण्याची इच्छा होती आणि त्यामुळे मी तिच्या वडिलांकडे तिचा हात देखील मागितला होता. पण त्यांनी माझ्या आणि जुहीच्या लग्नाला नकार दिला. मी जुहीसाठी योग्य नाही असे बहुधा त्यांना वाटले असेल. एवढेच नव्हे तर जुहीसोबत मला काम करायचे आहे. पण जुही माझ्यासोबत काम करायला तयार नाहीये असे देखील त्याने या मुलाखतीत सांगितले होते. 
सलमान चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी जुहीने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने तिचे एक स्थान निर्माण केले होते. तिच्यासोबत काम करण्याची सलमानची इच्छा होती. पण सुरुवातीच्या काळात जुहीने सलमानसोबत काम करण्यास नकार दिला होता असे म्हटले जात असे. पण करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात या केवळ अफवा असल्याचे जुहीने म्हटले होते. नंतरच्या काळात जुही आणि सलमान एका चित्रपटात काम देखील करणार होते. पण काही कारणांनी हा चित्रपट होऊ शकला नाही. 

 

Web Title: Salman Khan really wanted to marry Juhi Chawla at one time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.