सौम्या टंडन आणि रागिणी खन्ना येणार 'या' शोमध्ये एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 06:46 AM2018-03-26T06:46:34+5:302018-03-26T12:18:30+5:30
वीकेंडच्या एंटरटेनमेंटची व्याख्या बदलून टाकणारा कलर्सचा एंटरटेनमेंट की रात आता अधिक हास्य, नाट्य, रसदार गॉसिप आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत समोरासमोर ...
व केंडच्या एंटरटेनमेंटची व्याख्या बदलून टाकणारा कलर्सचा एंटरटेनमेंट की रात आता अधिक हास्य, नाट्य, रसदार गॉसिप आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबत समोरासमोर मनोरंजनासह दुसरा सीझन घेऊन येत आहे. एंटरटेनमेंट की रात @ 9 प्रेक्षकांना भारतीय टेलिव्हिजन वरील काही आवडत्या सेलिब्रिटी या आवृत्तीत सादर करणार आहे आणि त्यात दिवा सौम्या टंडन आणि रागिणी टंडन या एंटरटेनमेंट बँडवॅगन मध्ये सामील होणार आहेत. ही गंमतीदार जोडी सीझन 1 मधील कॉमेडियन बलराज, मुबिन सौदागर आणि बालकलाकार दिव्यांश यांनी हा वारसा तुमचे वीकेंड खऱ्या अर्थाने एंटरटेनमेंटचा खजिना बनविण्यासाठी हाती घेतला आहे.
नवीन कलाकार म्हणून शो मध्ये सामील झालेल्या सौम्या टंडन म्हणाल्या, “ भाबीजी घर पर है या माझ्या सीटकॉम मध्ये मी व्यस्त असल्यामुळे मी जवळपास तीन वर्षांनंतर होस्ट म्हणून परत येत आहे. डान्स इंडिया डान्स, आणि कॉमेडी सर्कस, जोर का झटका, मल्लिका के किचन आणि बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट नंतर एंटरटेनमेंट की रात @ 9 पुन्हा सुरूवात करण्यासाठी अगदी योग्य निवड आहे. हा अगदी नवीन स्वरुपाचा आहे आणि मी त्यात माझी शैली घालण्याचा प्रयत्न करणार आहे. मला व्यक्तिशः कॉमेडी अतिशय आवडते आणि तणावाचे जीवन जगत असणाऱ्या प्रेक्षकांच्या जीवनात हे शो हसू आणतात. मी जरी स्टँड-अप कॉमेडियन नसले तरी मी उत्स्फूर्त आहे आणि मला आशा आहे की या शो मधून मी तो सुधारेन आणि माझा स्वतःचा शोध घेईन. माझे यातील दिसणे हे आधीपेक्षा खूप जास्त ग्लॅमरस आहे पण मी ते सुंदर आणि मोहक बनवले आहे आणि तीच माझी शैली आहे.”
रागिणी खन्नाने सांगितले, “एंटरटेनमेंट की रातच्या पहिल्या सीझनची टीम पहायला मला खूप आवडत असे आणि दुसऱ्या वृत्तीत त्यात सहभागी होण्यासाठी मला आता राहवत नाही. आम्ही शो साठी चित्रीकरण सुरू केले आहे आणि नवी टीम असून सुध्दा आमचे धागे इतके जुळले आहेत की आमचे कॉमिक टायमिंग आणि पंचेस अचूक येत आहेत. आम्हा सर्वांची एकमेकांशी तार जुळली आहे आणि ती स्क्रीन वर सुध्दा नक्कीच दिसून येईल.”