वरूण धवन आणि अनुष्का शर्मा बनवणार बाप्पासाठी मोदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 18:41 IST2018-09-05T18:39:36+5:302018-09-05T18:41:32+5:30
अभिनेता वरूण धवन व अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टार प्लसवरील अद्भूत गणेश उत्सवच्या मंचावर हजेरी लावणार आहेत.

वरूण धवन आणि अनुष्का शर्मा बनवणार बाप्पासाठी मोदक
अभिनेता वरूण धवन व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा सुई धागाः मेड इन इंडिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या हे दोघे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. ते दोघे स्टार प्लसवरील अद्भूत गणेश उत्सवच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. इतकेच नाही तर बाप्पासाठी मोदक बनवणार आहेत.
गणेश चतुर्थी आता जवळ येऊन ठेपली असून स्टार प्लसवरील अद्भूत गणेश उत्सव प्रेक्षकांना त्यांच्या घरी मनोरंजन प्रदान करणार आहे. या कार्यक्रमात वरूण धवन व अनुष्का शर्मा सुई धागा चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत.यावेळी ते दोघे चित्रपटाचे प्रमोशन करतील आणि मनोरंजक अॅक्टिव्हिटिजही करणार आहेत. गणेश आरती करण्यापासून अगदी मोदकही ते करताना दिसतील. गणपती बाप्पासाठी ह्या दोघांना मोदक बनवताना पाहणे खरोखरीच मनोरंजक ठरणार आहे. तसेच ते काही लोकप्रिय गणेश गीतांवर नाचतानाही दिसून येतील आणि त्यांच्यासोबत मंचावर टेलिव्हिजन कलाकार दिव्यांका त्रिपाठी, करिष्मा तन्ना आणि नकुल मेहता हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. हा अद्भुत गणेश उत्सव १० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर रात्री ८ वाजता फक्त स्टारप्लसवर पाहता येणार आहे.
‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत येणाऱ्या ‘सुई धागा: मेड इन इंडिया’ या चित्रपटात वरुण टेलरची तर अनुष्का भरतकाम करणाऱ्या महिलेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करत आहे. आतापर्यंत वरूणने विविध भूमिका केल्या आहेत. तर अनुष्कादेखील पहिल्यांदाच एका गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघांनीही आतापर्यंत ग्लॅमरस भूमिका केल्या होत्या. स्वदेशी वस्तूंवर नेहमीच आपल्या देशात जोर देण्यात आला आहे. याचसंदर्भात एका विशिष्ट अंदाजात हा चित्रपट भाष्य करणार असल्याचे वरूणने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.वरूण व अनुष्काला एका वेगळ्या अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.